Next
स्वानंद समुद्र यांना मानाचा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’
प्रेस रिलीज
Monday, April 23, 2018 | 01:02 PM
15 0 0
Share this article:

‘यूटीआय’चे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी यांच्या हस्ते ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’ स्विकारताना पुण्यातील वैयक्तिक गुंतवणूक सल्लागार स्वानंद समुद्र.
पुणे : यूटीआय, इक्रा आणि सीएनबीसी १८ यांच्या वतीने देण्यात येणारा ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅवॉर्ड’ पुण्यातील वैयक्तिक गुंतवणूक सल्लागार स्वानंद समुद्र यांना मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारे ते महाराष्ट्रातील एकमेव सल्लागार आहेत. 

हा पुरस्कार त्यांना पश्चिम विभागातून मिळाला असून, तो वर्ष २०१७-१८ साठी मिळाला आहे. नुकत्याच बडोदा इथे झालेल्या ‘फायनान्शिअल अॅडव्हायझरी फोरम अॅवॉर्डस्’ सोहळ्यात हा पुरस्कार ‘यूटीआय’चे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी यांच्या हस्ते स्वानंद समुद्र यांना प्रदान करण्यात आला. 

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक गुंतवणूक सल्लागारांना दर वर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी देशभरातून तब्बल ३९ हजार अर्ज आले होते. त्यापैकी पाच जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात देशाच्या पश्चिम विभागातून, महाराष्ट्रातून निवड झालेले स्वानंद समुद्र हे एकमेव आहेत.

स्वानंद समुद्र हे गेली ३० वर्षे वैयक्तिक गुंतवणूक सल्लागार म्हणून पुण्यात कार्यरत आहेत. आयडीएफसी, आयसीआयसीआय, प्रिन्सिपल म्युच्युअल फंड अशा अनेक कंपन्यांनी त्यांना गौरविले आहे. शेअर बाजार, रोखे, म्युच्युअल फंड्स या क्षेत्रात गुंतवणूक करण्याबाबतचा सल्ला आणि सेवा ते देतात. रोटरी क्लबच्या पॉल हॅरिस फेलोशिपचे ते सदस्य आहेत. 

आर्थिक क्षेत्रात मानाचा समजाला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वानंद समुद्र यांनी आनंदाची भावना व्यक्त केली. ‘हा पुरस्कार मिळणे ही आतापर्यंतच्या मेहनतीची पावती असून, यामुळे जबाबदारीही वाढली आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुंतवणूक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.

(स्वानंद समुद्र यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mahesh About
Great news,many congratulations for achievement...
0
0
Dharmadhikari.Vinayak.V About
Congrats for yr great achivment.
0
0
Mrs kaiwalya Samudra About
We Are so proud of you Dad.. All d best.
1
0

Select Language
Share Link
 
Search