Next
नेल्डा फाउंडेशनतर्फे पुरस्कार
प्रेस रिलीज
Monday, July 03, 2017 | 03:56 PM
15 0 0
Share this article:

नेल्डा फाउंडेशनतर्फे पुरस्कार प्रदान.
पुणे : नेल्डा फाउंडेशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त ‘नेल्डा अभिवादन २०१७’ हा सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये करण्यात आले होते.

पुणे शहरात व परिसरामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या कामाची दखल घेऊन सन्मानित करण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १३ संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यात टेलस ऑर्गनायजेशनचा समावेश आहे.

टेलस ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांच्या नेतृत्वाखाली संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाविषयी सातत्याने पुण्यामध्ये, तसेच पुण्याबाहेर कार्यरत आहे. त्यामुळे संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या वेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वनराईचे रवींद्र धारिया उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी वृक्षारोपण व संशोधानाविषयक आपले मत मांडले. नेल्डा संस्थेचे वेदार्थ देशपांडे यांनी नेल्डा फाउंडेशनच्या कामाचा परिचय देऊन आपले मनोगत व्यक्त केले. टेलेस ऑर्गनायझेशनतर्फे विश्वास घावटे, जान्हवी बापट, मंजू घावटे, राजश्री कडू, संकेत जोगळेकर, भूषण शिवगण, सुमती आचार्य, किमया बापट यांना हा पुरस्कार रवींद्र धारिया, तसेच वेदार्थ देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search