Next
वडपे-ठाणे हायब्रिड अॅन्युइटी प्रकल्पाची पायाभरणी
प्रेस रिलीज
Monday, January 28, 2019 | 04:45 PM
15 0 0
Share this article:मुंबई : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील ठाणे ते वडपे या २३ किलोमीटरच्या टप्प्यातील म्हणजेच महामार्गावरील ५३९ किलोमीटर ते ५६३ किलोमीटर या चौपदरी मार्गाचा हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलने विकास करून तो आठ पदरी करण्याचे काम, पायाभूत विकास क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी, एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स करणार आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त तारीख प्राप्त झाल्याची घोषणा कंपनीने केली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच ठाण्यातील दिवे अंजूर येथे झाले.

या वेळी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभाग तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, मंत्री, बँकिंग क्षेत्रातील नामवंत, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पासाठी येस बँक अर्थसहाय्य देणार आहे.

या विषयी बोलताना ‘एमईपीचे इन्फ्रास्ट्रक्चर’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर म्हणाले, ‘हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलने रस्तेनिर्मिती करण्याचा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरवण्याची सुरुवात करण्याचा हा क्षण आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत व्यावहारिक आणि प्रागतिक असलेल्या या मॉडेलमुळे रस्ते वाहतुकीच्या क्षेत्राचा विकास जलदगतीने होईल आणि जगातील विकसित देशांच्या यादीत स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट लवकरात लवकर गाठण्यास हातभार लागेल.’

‘हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलच्या क्षेत्रात ‘एमईपी’ सध्या आघाडीवर असून, आतापर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातमधील अशा दहा प्रकल्पांच्या निविदांच्या लिलावप्रकियेत प्रकल्पांचे कंत्राट आम्हाला मिळाले आहे. ‘एमईपी’ या मॉडेलचे एका हजार ८९३ लेन किमीचे रस्ते बांधणार असून, या प्रकल्पांची एकूण किंमत सात हजार ९४२ कोटी रुपये इतकी आहे. आपल्या देशात पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे काम आम्ही पुढेही असेच सुरू ठेवणार असून, देशाला या क्षेत्रात जागतिक दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न आम्ही निश्चित पूर्ण करू,’ असा विश्वास म्हैसकर यांनी व्यक्त केला.

मुंबई-आग्रा महामार्ग या नावाने सुपरिचित असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा अत्यंत गर्दीचा आणि कायम प्रचंड वाहतूक असलेला महामार्ग आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, इंदोर, ग्वाल्हेर, धौलपूर आणि आग्रा या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या महामार्गावर कायमच वाहतुकीची गर्दी असते. या हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलचा टप्पा ठाणे ते वडपे, म्हणजे वडपेहूनपासून सुरू होत ठाण्याला माजिवडे जंक्शनपाशी संपणार आहे. हा दुभाजक असलेला चौपदरी मार्ग म्हणून विकसित होणार असून, ह्या पट्ट्याची एकूण लांबी २३.७९८ किमी आहे.   
 
या प्रकल्पाअंतर्गत सध्या असलेल्या चौपदरी महामार्गाचे आठ पदरी मार्गात विस्तारीकरण केले जाणार असून २३ हजार ७९८ किमी मार्गाच्या बाजूला सिमेंट-काँक्रिटचे पदपथ बांधले जाणार आहेत. तसेच एक नवा रेल्वे पूल आणि ठाणे खाडीवर दोन मोठे नवे पूल बांधले जाणार असून, या मार्गावर विविध ठिकाणी दोन छोटे पूल, ८४ पाणी वहन नलिका, एक ग्रेड विभाजक, एक पादचारी पूल आणि वाहतुकीच्या सोयीसाठी आठ वाहन बोगदेही बनवले जाणार आहेत. या मार्गावर असणारे सर्व पूल, ट्रक आणि बसेस बाजूला थांबवण्याची व्यवस्था, वैद्यकीय उपचार सुविधा, वाहतुकीची माहिती देणाऱ्या सुविधा आणि आराम करण्याचे थांबे, अशा अत्याधुनिक सुविधांमुळे या रस्त्यावरून होणारा प्रवास सुखकर तसेच, वेळ आणि इंधनाची बचत करणारा आणि आरामदायक होईल.

वडपे ते ठाणे या संपूर्ण टप्प्यातील रस्त्याच्या विकासाचा एकूण खर्च एक हजार १८२.८७ कोटी रुपये असून, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नियुक्त तारखेपासून ३० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलअंतर्गत विकसित केला जाणार आहे. हे मॉडेल ‘ईपीसी’ आणि ‘बीओटी’ या तत्त्वांना एकत्रित करून विकसित केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search