Next
२२वे ग्रामीण साहित्य संमेलन सहा जानेवारीला निमशिरगावमध्ये
डॉ. सुनीलकुमार लवटे संमेलनाध्यक्ष, श्रीनिवास पाटील उद्घाटक
BOI
Thursday, December 06 | 03:26 PM
15 0 0
Share this story

जयसिंगपूर : निमशिरगाव परिसर साहित्यिक संघ, साहित्यसुधा मंच आणि निमशिरगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रति वर्षी घेतले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यंदा सहा जानेवारी २०१९ रोजी होत आहे. यंदाचे संमेलनाचे २२वे वर्ष असून, संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची निवड करण्यात आली आहे. 

या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. श्रीवर्धन एस. पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत. सकाळी नऊ वाजता डॉ. सुकुमार मगदूम व डॉ. धवल एस. पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. उद्घाटनाला खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हासदादा पाटील, शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर, हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी, ‘एसआयटी’चे संचालक अनिल बागणे, दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील-बोरगावकर, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपस्थित राहणार आहेत. याच समारंभात समाजरत्न, साहित्यरत्न आणि शेतकरीराजा पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. 

दुसऱ्या सत्रात कृषी संस्कृती आणि साहित्य या विषयावर प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनावणे (पुणे) आणि कृष्णात खोत (कोल्हापूर) हे प्रमुख वक्ते आहेत. विश्वास निकम यांचे कथाकथन होणार असून, सायंकाळी ज्येष्ठ कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या-जुन्या कवींची काव्यमैफल रंगणार आहे. 

संमेलनाचे संयोजक पद्माकर पाटील, प्रा. शांताराम कांबळे, रावसाहेब पुजारी, सचिव गोमटेश पाटील, सरपंच बनाबाई कांबळे, उपसरपंच नेमगोंडा पाटील यांनी ही माहिती दिली. संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link