Next
भारतातील ईव्हीएम जगात सर्वोत्तम
BOI
Monday, March 27, 2017 | 04:50 PM
15 2 0
Share this article:

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांत विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्या ठिकाणी मतदानासाठी वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) गुणवत्तेवरून सध्या काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत; मात्र त्याच वेळी अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या पाहणीत भारतातील ईव्हीएम जागतिक पातळीवर सर्वोत्तम दर्जाची असल्याचे समोर आले आहे. 

मतदान प्रक्रियेसाठी ‘ईव्हीएम’चा वापर काही मोजक्याच देशांमध्ये केला जातो. इतकेच नाही, तर जगातील सर्वांत जुनी लोकशाही व्यवस्था असलेल्या अमेरिकेसारख्या देशात अजूनही बॅलट पेपर पद्धतीने मतदान केले जाते. कॅनडा, फ्रान्स, स्वित्झर्लंड यांसारखे काही देश मतदानासाठी रिमोट इंटरनेट व्होटिंग प्रणालीचा उपयोग करतात; मात्र या प्रणालीत यंत्रातील माहिती हॅक होण्याचा अथवा माहितीत बदल होण्याचा धोका असतो. 

भारतात वापरण्यात येणारी ‘ईव्हीएम’ बॅटरीवर चालतात. या मशीनमध्ये सांकेतिक स्वरूपात माहिती साठवण्याचे असलेले तंत्रज्ञान अधिक प्रगत आहे. देशातील आजवरच्या मतदान प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या ‘ईव्हीएम’संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आजवर राज्यांतील १०७ आणि लोकसभेच्या तीन निवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम’चा वापर करण्यात आला आहे. याशिवाय २०१४च्या लोकसभा निवडणुकीत एकूण नऊ लाख ३० हजार मतदान केंद्रांवर मतदानासाठी १४ लाख ईव्हीएम वापरण्यात आली होती.

 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search