Next
नाना पाटेकर यांच्या आवाजात ऐका गणपतीची आरती
BOI
Thursday, September 06, 2018 | 02:41 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : नाना पाटेकर यांचे गणपतीबाप्पावरील  प्रेम आणि भक्ती सर्वश्रुत आहे. त्यांची गणपतीवर दृढ श्रध्दा असून, दरवर्षी ते आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात. त्यासाठी सुंदर सजावट करतात. साग्रसंगीत पूजाअर्चा, आरती यांनी त्यांचे घर गजबजून गेलेले असते. यंदा आता नाना पाटेकर तुमचाही गणेशोत्सव अविस्मरणीय करणार आहेत. स्टार प्लस वाहिनीवरील ‘अद्भूत गणेशोत्सव’  या कार्यक्रमात नाना पाटेकर आपल्या दमदार गणपतीची आरती, तसेच श्लोकस्तवन करणार आहेत.

दहा ते चौदा  सप्टेंबरदरम्यान ‘स्टार प्लस’ वाहिनीवर भव्य सेट, नामवंत लोकांची भेट यांचा समावेश असलेला ‘अद्भूत गणेशोत्सव’  साजरा होणार आहे. या कार्यक्रमात आजवर टीव्हीवरील कार्यक्रमात कधीच न दिसलेले नाना पाटेकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search