Next
‘ओयो’ करणार चौदाशे कोटींची गुंतवणूक
BOI
Wednesday, March 13, 2019 | 06:27 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ओयो हॉटेल्स आणि होम्स’ कंपनीने भारतात आणि दक्षिण आशिया भागात तब्बल १४०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. 

‘देशात आणि परदेशातही व्यवसाय विस्तार करण्यासाठी कंपनीने ही मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे कंपनीचे संस्थापक आणि ओयो समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अगरवाल यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले,‘तंत्रज्ञान, नुतनीकरण यासाठी या गुंतवणुकीचा वापर करण्यात येणार असून, आणखी गुंतवणूक आवश्यक असल्यास त्याची तरतूद करण्याचाही प्रयत्न केला जाईल. आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी सर्वदृष्टीने आम्ही सज्ज आहोत.’

ओयो समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अगरवाल
‘कंपनीच्या विस्ताराचा एक भाग म्हणून या क्षेत्रात प्रथमच ओयो अॅपवर ‘एसओएस’ बटण देण्यात येणार आहे. २५ शहरांमध्ये ही सुविधा देण्यात येणार असून, ग्राहकांनी हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर हे बटण कार्यान्वित होईल. याद्वारे पोलिसांशी तसेच ओयोच्या सुरक्षा प्रतिसाद पथकाशी तत्काळ संपर्क साधला जाईल,’ असेही अगरवाल यांनी सांगितले. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link