Next
ठाण्यात हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव
प्रेस रिलीज
Friday, August 04, 2017 | 06:13 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : सालाबादप्रमाणे यंदाही नारळवाला चाळीमधील बाळगोपाळ मित्रमंडळाच्यावतीने ‘हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या महोत्सवाचे आयोजक, अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांनी दिली आहे.

या महोत्सवाला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, नेत्रशल्यविशारद तथा पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालघरचे शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, तसेच ठाणे जिल्ह्यातील मान्यवर डॉक्टर्सही उपस्थित राहणार आहेत. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून उत्सवास प्रारंभ होईल. अवयवदान चळवळीचे प्रणेते, रक्तकर्ण विलास ढमाले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या दहीहंडी महोत्सवाचे यंदाचे २६वे वर्ष आहे. यापूर्वी हा उत्सव ठाण्याच्या बाजारपेठेत महासरस्वती दहीहंडी उत्सव म्हणून १२ वर्षे साजरा केला जात होता. त्यानंतर हा उत्सव हिंदुहृदयसम्राट हृदयस्पर्शी अवयवदान दहीहंडी उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आणि यंदा हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव २०१७ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यंदा अवयवदान दहीहंडी उत्सवाचे १४वे वर्ष आहे. या उत्सवात ठाणे शहराबरोबरच अंबरनाथ, डोंबिवली, विक्रोळी, मालाड आदी ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या उत्सवाच्या वेळी अवयवदानाचे, तसेच देहदानाचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.

या उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची थर लावण्याची स्पर्धा नसते. दिव्यांग मुलांच्या जीवनात जिद्द निर्माण व्हावी याकरिता, तसेच अवयवदानाबद्दल जनजागृती व प्रसार व्हावा याकरिता दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी सर्वच शाळांना सम प्रमाणात रोख पारितोषिके व चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सर्व गोविंदा पथकांची आणि त्यांच्यासोबत येणारे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांची नाश्ता व जेवणाची सोयही करण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवाबरोबरच सहभागी मुलांना वह्या, औषधे (टॉनिक) यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्व शाळांना रोपे भेट म्हणून देण्यात येणार आहेत. या दिव्यांग दहीहंडी महोत्सवात ज्या शाळांना सहभागी व्हायचे असेल, त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक विलास ढमाले यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : मंगळवार, आठ ऑगस्ट
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : शिवाजी मैदान, जांभळी नाका, मासुंदा तलाव, ठाणे

संपर्क : ९८२०६ ७००९०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search