Next
बारावीचा ऑनलाइन निकाल २८ मे रोजी
BOI
Monday, May 27, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल २८ मे २०१९ रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजल्यानंतर mahresult.nic.in या वेबसाइटवर हा निकाल उपलब्ध होणार आहे. मंडळाकडून याबाबतची अधिकृत घोषणा २७ मे रोजी करण्यात आली. 

मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन त्यात राज्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल वेबसाइटवर पाहता येईल, असे कळवण्यात आले आहे. प्रत्यक्ष गुणपत्रिका कधी मिळतील, याचे वेळापत्रक मात्र अद्याप मंडळाने जाहीर केलेले नाही. 

mahresult.nic.in या वेबसाइटबरोबरच examresults.net, indiaresults.com, results.gov.in या वेबसाइटवरही निकाल उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉल तिकीट/बैठक क्रमांकाच्या आधारे आपला निकाल शोधता येईल.

बीएसएनएल मोबाइल ग्राहकांना एसएमएसद्वारेही निकाल उपलब्ध होणार आहे. त्यासाठी MHSSC<Space>Seat No. या पद्धतीचा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

(बारावीच्या राज्याच्या निकालाबद्दलची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anant About 89 Days ago
No
0
1
Sangram Sanjay mali About 90 Days ago
Marks
0
3

Select Language
Share Link
 
Search