Next
‘स्टार प्रवाह’वर लवकरच ‘श्री गुरुदेव दत्त’
दत्तगुरुंचा महिमा सांगणारी पौराणिक मालिका
प्रेस रिलीज
Monday, June 03, 2019 | 04:32 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘विठुमाऊली’ मालिकेला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादानंतर ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणखी एक पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. दत्तगुरुंचा महिमा सांगणारी ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका १७ जून २०१९ पासून सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दत्तगुरुंचा जन्म कसा झाला, बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनसूयासोबतचे त्यांचे नाते मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे पुराणांमध्ये दत्तगुरुंचे वर्णन केले जाते. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. दत्तगुरुंच्या अवताराची ही गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणार आहे. 

या विषयी सांगताना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतक्या महान अवताराची कथा सांगताना गर्व, अभिमान आणि आनंद वाटतोय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा मिळून एक अवतार जन्मला ते म्हणजे दत्तगुरू. दत्तगुरुंच्या अवताराची जन्मापासूनची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळले. अत्री ऋषी आणि माता अनसूयेच्या पोटी जन्माला येण्यापासून ते अगदी आजही त्यांच्या महात्म्याची वेळोवेळी प्रचिती देणारी अद्भुत कथा सादर करण्याचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा प्रयत्न असेल. अध्यात्म, सत्य आणि अप्रतिम व्हिज्युअल इफेक्टस याची उत्तम सांगड या मालिकेत दिसेल.’

सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक दीपक देऊळकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, दिग्दर्शक अनिल राऊत आणि स्वत: देऊळकर या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे आहे. पौराणिक काळ जिवंत करणारा भव्यदिव्य सेट हे या मालिकेचे वैशिष्ट्य आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search