Next
‘जिओ’ची ‘दिवाळी धन धना धन’ ऑफर
प्रेस रिलीज
Friday, October 13 | 06:43 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी ‘दिवाळी धन धना धन’ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत चालू महिन्यात १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ३९९ रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या  प्री-पेड ग्राहकांना १०० टक्के ‘कॅशबॅक’ आणि आपला मागील ऑफर प्लॅन कायम ठेवता येणार आहे. ही ऑफर फक्त प्री-पेड ग्राहकांसाठी असून ती आगाऊ रिचार्जसारखे काम करेल, म्हणजेच ज्या ग्राहकांची वैधता संपणार असेल त्यांना देखील या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.

‘जिओ’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दिवाळी धन धना धन’ ऑफरअंतर्गत ३९९ रुपयांचे रिचार्ज केल्यास आधीचा प्लॅन कायम ठेवता येणार आहे. शिवाय ८४ दिवसांसाठी १जीबी ४जी डेटा मिळणार आहे. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, एसएमएस आणि देशांतर्गत रोमिंगची सुविधा मिळणार आहे. १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ३९९ रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर १९ ऑक्टोबरपासून हा प्लॅन लागू होणार आहे. दिवाळी आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या ऑफर्सच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओने ही कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link