Next
छत्रपती शिवाजी अँड सुराज्य
BOI
Monday, August 19, 2019 | 10:33 AM
15 0 0
Share this article:

शिवाजी महाराजांना ‘रयतेचा राजा’ असे संबोधले जाते. रयतेसाठी त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. कुशल प्रशासक व यशस्वी शासक असलेल्या शिवाजी महाराजांनी सुशासनाच्या पायावर समाजाची उभारणी केली. हे करताना ते कसे विचार करीत, कसा निर्णय घेत, त्यांच्या राज्यकारभाराची शैली आदी गोष्टींचा विचार करून त्यासंबंधीचे मार्गदर्शन अनिल माधव दवे यांनी ‘छत्रपती शिवाजी अँड सुराज्य’ या पुस्तकामधून केले आहे. त्या काळातील परदेशांतील राजे व विद्वानांच्या मनातील शिवरायांची प्रतिमा, त्यांची स्वराज्याची संकल्पना, अचूक आकलन व निर्णयक्षमता, सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा गुण, निर्भयता आदी बाबींवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रमुख मंत्रालये, वने व पर्यावरण, महिला सबलीकरण, अल्पसंख्याक स्व-प्रेरित राज्यरचना या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडताना दूरदृष्टी व राजकीय वाटचाल, योजकता आणि कार्यान्वयन क्षमता, अष्टप्रधान यावरही पुस्तकात भर देण्यात आला आहे. समर्थ आणि दुर्बळ शासन आणि शासक यांची लक्षणेही यात दिली आहेत.

पुस्तक : छत्रपती शिवाजी अँड सुराज्य
लेखक : अनिल माधव दवे
प्रकाशक : हिंदुस्थान प्रकाशन संस्था
पृष्ठे : २३०
मूल्य : ५०० रुपये

(‘छत्रपती शिवाजी अँड सुराज्य’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search