Next
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’
संस्कृत शिक्षण वर्ग पूर्ण करणार्‍यांना ‘गोगटे-जोगळेकर’मध्ये प्रमाणपत्र वितरण
BOI
Monday, December 10, 2018 | 02:06 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले. 

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत शिक्षण केंद्रातून उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र वितरण करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. त्या वेळी ते बोलत होते. ते हिमाचल प्रदेशातून आले आहेत. या वेळी केंद्राच्या समन्वयक, संस्कृत विभागप्रमुख आणि उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. स्नेहा शिवलकर उपस्थित होत्या. १२ ते ७० वर्षे वयोगटांतील ७२ जणांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. रा. भा. शिर्के प्रशाला व जीजीपीएस शाळेतील विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेतले. या सर्वांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

दीपक जोशी यांच्या सहकार्याने गणपतीपुळे येथेही केंद्र सुरू होते. सहभागी परीक्षार्थी अक्षया भागवत, वैद्य संतोष केळकर, शीतल घनवटकर, सार्थक, गीता पंडित, नारायणी शहाणे, शीतल पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

‘किमान २० व्यक्ती, तसेच गृहनिर्माण संस्थांमधील व्यक्तींनी या वर्गासाठी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना संस्कृत शिकवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सेवानिवृत्त, गृहिणींनी सहभाग घेतल्यास या उपक्रमाचा हेतू सफल होईल,’ असे आवाहन महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. आठल्ये यांनी या प्रसंगी केले.

पुढील वर्गात सहभागी होण्यासाठी संपर्क : डॉ. कल्पना आठल्ये- ७७२०० ३२३०२.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 110 Days ago
If you are interested in Space - technology , knowledge of the Russian language is almost obligatory . What is the situation for Sanskrit ?
0
0
BDGramopadhye About 139 Days ago
As matters stand , it can serve the same purpose as Latin does . It can serve as the base . Multiplicity of scripts is the real problem we have .
0
0

Select Language
Share Link
 
Search