Next
रत्नागिरीकरांनी अनुभवली ‘नृत्यसुमनांजली’
साईश्री नृत्य कला मंदिरतर्फे आयोजन
BOI
Wednesday, October 10, 2018 | 03:54 PM
15 0 0
Share this article:

‘नृत्यसुमनांजली’ हा नृत्याविष्कार सादर करताना साईश्री नृत्य कला मंदिरच्या विद्यार्थिनी

रत्नागिरी : येथील साईश्री नृत्य कला मंदिरच्या गुरू मिताली भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्यांनी ‘नृत्यसुमनांजली’ हा नृत्याविष्कार सादर केला. हिंदुस्थानी आणि कर्नाटकी अशा दोन वेगवेगळ्या शैलीतील गीतांवरील भरतनाट्यम नृत्याची अनोखी मेजवानी रत्नागिकरांनी अनुभवली.

येथील जयेश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यात साईश्री नृत्यावर्गात शिक्षण घेणाऱ्या मीरा खालगावकर, गिरीजा आंबर्डेकर, अपाला औंधकर, उर्वी जोशी, सिमंतिनी जोशी, न्यासा पेडणेकर, शिवानी केळकर, श्रद्धा पवार, श्रेष्ठा विलणकर, पूर्वा जोगळेकर, केतकी सारोळकर, स्वराक्षी कदम, सुरभी मेहेंदळे, आदिती गिडिये, दृष्टी वीरकर, अनुष्का सावंत, ऋद्धी शेवडे, ईशा रहाटे यांनी नृत्य सादर केले. यामध्ये पुष्पांजली, गणेश कौत्वम्, शब्दम, कीर्तनम, मका गणपती, अभंग, गीतरामायण, तिल्लाना आदी नृत्याविष्कारांचा समावेश होता.कर्नाटकी शैलीतील विविध गीतप्रकार सोमैय्या नेदुगंदी व हिंदुस्थानी गीतप्रकार अजिंक्य पोंक्षे यांनी गायले. त्यांना श्री. व्यंकटेश (मृदंगम), मिताली भिडे (नटुवांगम), केदार लिंगायत (तबला), बाल सुब्रह्ममण्यम (व्हायोलिन), संजय शशीधरन् (बासरी), मंगेश मोरे (सिंथेसायझर) यांनी संगीतसाथ केली. महेंद्र पाटणकर व पूर्वा खालगावकर यांनी दोन्ही संगीतप्रकारातील बारकावे निवेदनातून उलगडले.

एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत यांचे ध्वनिसंयोजन केले. जान्हवी घोसाळकर यांनी ड्रेस डिझायनिंग केले. या वेळी डॉ. श्रीकृष्ण जोशी, वात्सल्य-स्नेहचे राजशेखर मलुष्टे, रत्नागिरी-आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी श्रीनिवास जरंडीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्व शिष्यांच्या पालकांचा, विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सौ. माधवी गोखले About
फार सुंदर कार्यक्रम डोळ्यांच पारण फेडणारा खूप छान
0
0
mansi buva About
mast
0
0
Satish Yashwant Ranade About
Very nice
1
0

Select Language
Share Link
 
Search