Next
येस बँकेतर्फे निधीची उभारणी
प्रेस रिलीज
Friday, February 09, 2018 | 03:37 PM
15 0 0
Share this story

मुंबई : येस बँक या भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील यशस्वीपणे इश्यूइन्स पूर्ण करणाऱ्या बँकेने आंतरराष्ट्रीय डेब्ट बाजारात तब्बल ६०० दशलक्ष यूएस डॉलर्सचे बाँड इश्यूइन केले आहेत. हे बाँड पाच वर्षांच्या टेनरसाठी इश्यूइन्स करण्यात आले असून, मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसद्वारे बीएए३ गुणांकन प्राप्त आहेत.

हा बाँड लंडन स्टॉक एक्सेंज इंटरनॅशनल सिक्युरिटीज मार्केट (एलएसई आयएसएम), सिंगापूर एक्सेंज सिक्युरिटीज ट्रेडिंग (एसजीएक्स) आणि इंडिया इंटरनॅशनल एक्सेंज आयएफएससी, गिफ्ट सिटी, गांधीनगर येथे नोंदणीकृत होईल.

प्राथमिक स्तरावर सादर करण्यात आलेल्या या व्यवहारात ट्रेजरी क्षेत्रात १५० बेसिस पॉइंट मिळालेले आहेत. बँक पाच वर्षांपर्यंत यूएस ट्रेजरी क्षेत्रात १३० बेसिस पॉइंटपेक्षा जास्त अंतिम दर प्राप्त करण्यास सक्षम आहे. भारतीय बँकांच्या ५०० दशलक्ष यूएस डॉलर्सच्या इश्यू साइजद्वारे डेब्युट फिक्स्ड रेट इंटरनॅशनल बाँड इश्यूइन्ससाठी हा ट्रेजरीपेक्षा सर्वात कमीत कमी प्रसार आहे. सीएलएसए लिमिटेड, एचएसबीसी, जेपी मॉर्गन सिक्युरिटीज, मेरिल लांच इंटरनॅशनल, नामुरा, स्टँडर्ड चार्टर्ड आणि येस बँक (आयएफएससी) आदींनी ऑफरिंगसाठी जॉइंट बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) म्हणून कार्य केले आहे.

इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्सकडून या बाँडला भरघोस प्रतिसाद लाभला आहे. गुंतवणुकांच्या प्रकारात अॅसेट मॅनेजर्स ४६ टक्के, बँकांसाठी ३८ टक्के, इन्शुरन्स कंपन्यांसाठी ११ टक्के आणि खासगी बँकांसाठी पाच टक्के असे विभाजन करण्यात आले आहे. भौगोलिक वितरणासाठी आशियाई खात्यांना ५८ टक्क्यांचे विभाजन करण्यात आले आहे. ‘ईएमईए’ला ४१ टक्के आणि ऑफशोअर यूएस खात्यांना एक टक्का असे विभाजन मिळाले आहे.

बँकेच्या आयएफएससी बँकिंग युनिट (आयबीयू) निधीसाठी ही प्रक्रिया गिफ्ट सिटीमध्ये वापरण्यात येईल आणि आयबीयूमध्ये व्यावसायिक संधींचा झपाट्याने विकास होईल. बाँड इश्यूइन्स भारत सरकारबरोबर संलग्नित असून, याद्वारे आपल्या देशात हाय-टेक वित्तीय हब उभारण्यात येण्यासाठी वचनबद्ध आहे.

या बाँड इश्यूइन्सबद्दल येस बँकेचे एमडी आणि सीईओ राणा कपूर म्हणाले की, ‘येस बँकेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या एमटीएन उपक्रमासाठी परकीय चलनातील बाँड ऑफरिंग देणारा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे आणि यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणात सबस्क्रिप्शन झाले आहे; तसेच उच्च पातळीवरील गुंतवणूकदारांनी टेस्टमेंटच्या आधारावर बँकेच्या जागतिक गुंतवणूकदारांद्वारे समतोल राखण्याचे वचन दिले आहे. भारताला गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जाईल. जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार आपल्या देशाला पहिली पसंती देतील, याबाबत मला खात्री आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link