Next
बँक ऑफ बडोदा देशातील दुसरी मोठी सार्वजनिक बँक
बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँकेचे विलीनीकरण पूर्ण
BOI
Monday, April 01, 2019 | 06:16 PM
15 0 1
Share this article:


पुणे : विजया बँक व देना बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झाल्याने, एक एप्रिल २०१९ पासून बँक ऑफ बडोदा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणून उदयास आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० मार्च २०१९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बँक व देना बँक यांच्या सर्व शाखा एक एप्रिलपासून बँक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. विजया बँक व देना बँक यांच्या ठेवीदारांसह सर्व ग्राहकांना सदर तारखेपासून बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असे समजले जाईल.तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर २०१८ च्या अखेरीस दिलेल्या तत्त्वतः मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली.


बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांच्या विलीनीकरणाबाबत पुण्यात पत्रकार परिषदेत माहिती देताना बँक ऑफ बडोदाचे उपमहाव्यवस्थापक जे. रामगोपाल, विभागीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक राजेश कुमार, उपमहाव्यवस्थापक महेंद्रसिंग रोहेरीया उपस्थित होते.

याबाबत पुण्यात पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना बँक ऑफ बडोदाचे उपमहाव्यवस्थापक जे. रामगोपाल म्हणाले, ‘बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक एकत्र येत आहेत आणि त्यातून जाळे व ग्राहक वर्ग या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक निर्माण होणार आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. एक सक्षम बँक निर्माण करण्यासाठी आणि एकेका बँकेपेक्षा एकत्रितपणे सर्व संबंधित घटकांना उत्तम सेवा देण्यासाठी, सर्व आवश्यक बाबींची परिणामकारक अंमलबजावणी करून, आम्ही या विलिनीकरणाच्या यशस्वितेसाठी योगदान देणार आहोत. तिन्ही बँकांची वैविध्यपूर्ण उत्पादने, तंत्रज्ञानातील लक्षणीय गुंतवणूक आणि सेंटर ऑफ एक्सलन्स अँड अॅनालिटिक्स अँड एआय अँड टेक्नालॉजी हे व्यापक ग्राहक वर्गासाठी फायदेशीर ठरणार आहे. देना बँकेच्या ग्राहकांना तातडीने कर्ज सुविधा मिळू शकते. आमचे ग्राहक, कर्मचारी, भागीदार व अन्य भागधारक यांच्यासाठी आधुनिक व जागतिक दर्जाची बँकिंग संस्था निर्माण करण्यासाठी आम्ही तिन्ही शाखांच्या समृद्ध परंपरेचा लाभ घेण्याच्या संधीचे सोने करणार आहोत.'  

या वेळी विभागीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक राजेश कुमार, उपमहाव्यवस्थापक महेंद्रसिंग रोहेरीया उपस्थित होते.

‘ही एकीकरण झालेली बँक देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक असेल. बँकेची भौगोलिक व्याप्ती अधिक व्यापक होईल व त्यामध्ये नऊ हजार पाचशेपेक्षा अधिक शाखा, १३ हजार चारशेपेक्षा अधिक एटीएम, ८५ हजारांहून अधिक कर्मचारी आणि १२० दशलक्षपेक्षा  अधिक ग्राहक अशी या बँकेची व्याप्ती असेल. बिझनेस मिक्स १५ लाख कोटी रुपयांहून अधिक असेल. त्यामध्ये ठेवी व कर्जे यांचे प्रमाण अनुक्रमे अंदाजे ८.७५ लाख कोटी रुपये व अंदाजे ६.२५ लाख कोटी रुपये असेल. बँकेचे पश्चिमेकडील व दक्षिणेकडील राज्यांतील जाळे वाढणार आहे. एप्रिल २०१९ च्या अखेरीस सर्व शाखांमध्ये महत्त्वाच्या बँकिंग सुविधांची उपलब्धता केली जाईल व त्यांची व्याप्ती हळूहळू वाढवली जाईल. आयटी एकात्मिकरण १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत तिन्ही बँकांच्या ग्राहकांची खाती एका कोअर बँकिंग सिस्टीममध्ये समाविष्ट केलेली असतील,’ असेही रामगोपाल यांनी  सांगितले.
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search