Next
तुमच्या यशाची गुरुकिल्ली
BOI
Saturday, March 24, 2018 | 10:12 AM
15 0 0
Share this article:

बऱ्याचदा दुसऱ्याच्या अनुभवावरून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. एन. भट्टाचार्य यांनी या पुस्तकात, तर आपल्यासमोर थॉमस एडिसन, धीरूभाई अंबानी, वॉल्ट डिस्नी अशा थोरांच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांची वाटचाल, परिश्रम यांविषयी सांगितले आहे. त्याचबरोबर महत्त्वाकांक्षा, स्व-क्षमता, सकारात्मक दृष्टिकोन, बुद्धीसामर्थ्य, प्रामाणिकपणा या मुद्द्यांवर स्वतंत्र प्रकरणांमधून लिहिले आहे.

आपण हाती घेतलेल्या कामांत आणि जीवनातही यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक असते. उदा. कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी काय करावे, कल्पनांना कृतीत कसे उतरवावे, समूहकामाची गरज कशी असते, ध्येयाचे नियोजन करणे कसे आवश्यक असते, स्वतःचे काम स्वतःच पूर्ण करण्याचा उपयोग कसा होतो आदींविषयी सांगितले आहे. याशिवाय दिरंगाई करू नका, चुकीचा आदर्श ठेवू नका, नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करा, असे सल्लेही मिळतात.

प्रकाशक : बजिंग स्टॉक पब्लिशिंग हाउस
पाने : १५०
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search