Next
पारंपरिक मोलकालमुरू सिल्क साडीला आधुनिकतेचा साज
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प
प्रेस रिलीज
Monday, May 13, 2019 | 05:12 PM
15 0 0
Share this article:

मोलकालमुरू सिल्क साडीचा वापर करून नवनवीन आधुनिक वस्त्र प्रावरणे सादर करताना विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक.

इचलकरंजी : ‘डीकेटीई’मधील अंतिम वर्ष फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक मोलकालमुरू सिल्क साडीचा उपयोग करून भारतीय व पाश्‍चिमात्य पद्धतीचा मेळ साधत आधुनिक ड्रेसेस तयार केले आहेत. 

सध्याच्या तरुणाईला इंडो-वेर्स्टन कपड्यांचे आकर्षण असून, अशा कपड्यांची वाढती मागणी लक्षात घेवून ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये पारंपरिक मोलकालमुरू सिल्क साडीचा वापर करत नवनवीन आधुनिक वस्त्र प्रावरणांचे कलेक्शन तयार केले आहे. यामध्ये क्रॉप टॉप विथ पलाजो, जंप सूट विथ केप, वनसाइडेट रुफेल्स टॉप, वन पीस विथ बॉक्स प्लीट असे लेडीज वेअर आणि वेस्टर्न मेन्स कुर्ता असे पाच ड्रेस आहेत. याद्वारे पारंपरिक डिझाइन व आधुनिक वस्त्र प्रावरणे यांचा सुंदर मिलाफ घडून आला आहे. हा प्रकल्प हँडलूम कापडावर आधारित असल्यामुळे हँडलूम उद्योगाला उर्जितावस्था मिळाली आहे. 

मोलकालमुरू सिल्कचा साडीशिवाय इतर कपड्यांसाठी वापर केलेला नाही. आजकाल पारंपरिक किंवा प्रासंगिक म्हणून इंडो-वेस्टर्न कपडे वापरणे सर्वच जण पसंत करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून ‘डीकेटीई’तील शिवतेज गस्ती, एकता बडवे, पूर्वा सोलकणपाटील, निकिता झरकर व मंजुश्री काळे या विद्यार्थ्यांनी प्रा. एल. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोलकालमुरू सिल्क साडीची निवड केली. 

मोलकालमुरू हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव कर्नाटक राज्यात चित्रदुर्ग जिल्ह्यात असून, येथील बहुतांश नागरिक पारंपरिक सिल्क साडी बनविण्याच्या व्यवसायात अग्रेसर आहेत. त्यामुळे येथील मोलकालमुरू साडी ही प्रसिद्ध आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील व विभागातील सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search