Next
अशोक नायगावकर
BOI
Friday, December 29, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

‘कुठला तरी पुतळा उखडतो, अथवा ध्वज पायाखाली जातो - आपण संदर्भ विसरून टाळ्या वाजवतो’ असं आपल्या ‘आपण तेच लोक असतो’ या उपरोधिक कवितेतून सांगणारे कवी अशोक वसंत नायगावकर यांचा २९ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
.....
२९ डिसेंबर १९४७ रोजी वाईमध्ये जन्मलेले अशोक वसंत नायगावकर हे सध्याच्या लोकप्रिय कवींपैकी एक आहेत. आपल्या काव्यातून कलात्मकता आणि सामाजिकता यांचा समन्वय साधणारे कवी म्हणून ते ओळखले जातात. उपरोधाचा फार सुरेख वापर त्यांच्या विचार करायला भाग पाडणाऱ्या हास्यकवितांमधून बघायला मिळतो.

त्यांना महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार, तसंच विशाखा पुरस्कार  मिळाला आहे.

२०१२ साली दापोलीमध्ये भरलेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृद्ध व्हाल,’ असे ते म्हणतात.

त्यांनी भारताबाहेरच्या अनेक ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळांमध्ये कवितेच्या मैफली केल्या आहेत.

त्यांच्या ‘शाकाहार’ या गमतीशीर कवितेतल्या काही ओळी -

गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत
क्रूरपणे त्वचा सोलली जातेय दुधी भोपळ्याची
सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे
डोळ्यांची आग आग होतेय
शहाळ्या-नारळावर कोयत्याने दरोडा घातला आहे
हे भाजलं जातं आहे वांगं - निथळतंय त्वचेतून पाणी टप टप
तडतडल्या मोहरी, हा खेळ चाललाय फडाफडात
कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात,
आणि तिखट जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यांत
धारेवर किसली जात आहेत गाजरं ... ’

हे सर्व डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभं करून ते एक वेगळाच परिणाम साधतात.

वाटेवरच्या कविता, कवितांच्या गावा जावे, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search