Next
कुलभूषण जाधव यांच्यासाठी सह्यांची मोहीम
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 05:38 PM
15 0 0
Share this story

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी राबविलेल्या सह्यांच्या मोहिमेचे निवेदन उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे देताना सुनीताताई जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाताई कुर्लेकर, मीनाक्षी नवले, विजयकुमार मर्लेचा.

पुणे : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी वंचित विकास संस्थेने महाराष्ट्रभर सही मोहीम राबवली होती. राज्यभरातील हजारो नागरिकांनी दिलेल्या सह्या आणि प्रतिक्रियांचे निवेदन संस्थेतर्फे मंगळवारी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. येत्या दोन-तीन दिवसात प्रत्यक्ष कुटुंबीयांकडे हे निवेदन सोपवले जाईल, असे आश्वासन या वेळी राजेंद्र मुठे यांनी दिले.

या वेळी वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीनाताई कुर्लेकर, सुनीताताई जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले व उद्धव भडसाळकर उपस्थित होते. या सही मोहिमेत स्वरूप वर्धिनीचे शिरीष देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. 

‘या मोहिमेअंतर्गत राज्याच्या विविध भागात जाऊन संस्थेच्या प्रतिनिधींनी नागरिकांकडून सह्या संकलित केल्या. अनेक नागरिकांनी आम्ही आपल्यासोबत आहोत. कुलभूषण जाधव सुखरूप परत येतील, अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त करत कुटुंबियांना आधार दिला आहे, असे मीनाताई कुर्लेकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link