Next
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकोचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
BOI
Tuesday, June 04, 2019 | 02:07 PM
15 0 0
Share this article:

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकोचा सर्वोच्च नागरी सन्मान राजदूत सॅन्युआ एल्बा प्रिया यांनी प्रदान केला.

पुणे : मेक्सिको सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा ‘ऑर्डेन मेक्सिकाना दे अॅग्विला अॅलझटेका’ हा पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना नुकताच पुण्यात एका शानदार समारंभात प्रदान करण्यात आला. मेक्सिकोच्या भारतातील राजदूत सॅन्युआ एल्बा प्रिया यांनी पाटील यांना हा पुरस्कार प्रदान केला. 

मेक्सिकोच्या जडणघडणीत पाटील यांनी दिलेल्या योगदानाबाबत कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार प्रदान करत असल्याचे मेक्सिको सरकारतर्फे या वेळी सांगण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, नेल्सन मंडेला, राणी एलिझाबेथ द्वितीय, बिल गेट्स यांना यापूर्वी या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजूमदार, डॉ. देविसिंह शेखावत, ज्योती राठोड, मोहन जोशी, उल्हास पवार, शरद रणपिसे, डॉ. शिवाजीराव कदम, चंद्रकांत शिवरकर, डॉ. के. एम. संचेती, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 ‘मेक्सिको सरकारच्यावतीने देण्यात आलेला पुरस्कार हा देशाचा गौरव आहे,’ असे प्रतिपादन देशाच्यात माजी राष्ट्रूपती प्रतिभा पाटील यांनी या वेळी केले. त्या पुढे म्हणाल्या ‘स्वातंत्र्यलढय़ात आपले अमूल्य योगदान दिलेल्या विजयालक्ष्मी पंडित या भारताच्या मेक्सिकोतील प्रथम राजदूत होत्या. त्या काळापासून भारत आणि मेक्सिको या देशांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. मेक्सिको आणि भारत या दोन्ही देशांपुढे असलेले नागरी प्रश्न हे समान असल्याने दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यातून ते सोडवणे आवश्यक आहे.’ 

‘राष्ट्रपतीपदी असतांना मेक्सिको आणि भारत देशामध्ये विविध क्षेत्रातील परस्पर सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. देशाच्या राष्ट्रूपतीपदी असतांना २००७ मध्ये मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्डेारॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर मी २००८ मध्ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते,’ अशी आठवण पाटील यांनी या वेळी सांगितली.

पाटील यांनी या सोहळ्याची आठवण म्हणून मेक्सिकोच्या राजदूत सॅन्युआ एल्बा प्रिया यांना म. गांधी यांच्या स्मृतीचे प्रतीक असलेला चरखा भेट म्हणून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा शहा यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. शैलेश गुजर यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 130 Days ago
M . N . Roy had played a very important part in the formation of the Communist Party of Mexico .
0
0

Select Language
Share Link
 
Search