Next
‘भाजप’ महिला मोर्चाची १० ऑक्टोबरपासून यात्रा
प्रेस रिलीज
Wednesday, October 10, 2018 | 04:56 PM
15 0 0
Share this story

मुंबई : नवरात्रीच्या निमित्ताने राज्यातील शक्तीपीठांना व प्रेरणा केंद्रांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा ॲड. माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांची ‘जागर आदिशक्तीचा, सन्मान नारीशक्तीचा’ ही दोन हजार २०० किलोमीटरची यात्रा १० ऑक्टोबरला नाशिक येथून सुरू झाली आहे.

ॲड. नाईक म्हणाल्या, ‘भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत नाशिक येथे यात्रा सुरू झाली. या वेळी प्रदेश महिला मोर्चाच्या प्रभारी व प्रदेश सचिव उमा खापरे उपस्थित होत्या. नाशिक, अहमदनगर, बुलढाणा, परभणी, माहूर (नांदेड), उस्मानाबाद, कोल्हापूर व सातारा मार्गे दोन हजार २०० किमीची यात्रा १० ते १७ ऑक्टोबर या कालावधीत महिला कार्यकर्त्या करणाऱ्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे एक दिवस यात्रेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत; तसेच परभणी येथील कार्यक्रमात प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक उपस्थित राहणार आहेत.’

ॲड. माधवी नाईक‘नाशिकमध्ये सप्तशृंगी देवीचे दर्शन, चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली, सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंना प्रणाम, परभणी येथे संत जनाबाई यांचे स्मरण, नांदेडमध्ये भिमाई यांना नमन, उस्मानाबाद येथे राजमाता विजयाराजे शिंदे यांना आदरांजली, कोल्हापूर येथे ताराराणी यांना अभिवादन, तर सातारा जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण, असे यात्रेतील कार्यक्रमाचे स्वरूप असेल. ठिकठिकाणी विविध क्षेत्रातील यशस्वी भगिनींचा सन्मान करण्यात येईल; तसेच भाजप सरकारने महिलांसाठी केलेल्या कामाची माहिती देण्यात येईल,’ अशी माहिती ॲड. नाईक यांनी दिली.

शेतकरी महिला संमेलन, बचतगट मेळावा, अंगणवाडी सेविकांचा सन्मान, महिला कीर्तनकारांचा सत्कार, अनुसूचित जाती–जमातींच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती देणारा मेळावा, महिला लोकप्रतिनिधी संमेलन, सैनिकांच्या विधवांचा सत्कार आणि विद्यार्थिनींचा मेळावा असा भरगच्च कार्यक्रम यात्रेदरम्यान आखलेला आहे.

‘भाजप महिला मोर्चा माजी राष्ट्रीय अध्यक्ष कांता नलावडे, माजी प्रदेशाध्यक्ष नीता केळकर व आमदार स्मिता वाघ या यात्रेत सहभागी होणार आहेत. भाजपच्या ठिकठिकाणच्या खासदार, आमदार, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्या आदी लोकप्रतिनिधी विविध ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी होतील,’ असे ॲड. नाईक यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link