Next
‘वियू’तर्फे ‘मेमरिज’ ही नवीन डिजिटल सीरीज
प्रेस रिलीज
Friday, July 06, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this story

मुंबई : वेब आशयासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘वियू’तर्फे प्रेक्षकांसाठी ‘मेमरिज’ नावाचा आणखी एक खास कार्यक्रम सादर होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट यांनी या कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले असून, गुन्हेगारी-नाट्यपूर्णतेच्या (क्राईम-ड्रामा) कथेवर ही सीरीज आधारित आहे.

‘मेमरिज’ ही लोकप्रिय वृत्तवाहिनीचा सभ्य आणि सुस्वरूप निवेदक असलेल्या मानव मल्होत्रा याची कथा आहे. स्वतःकडे असलेल्या विलक्षण शक्तीमुळे तो पोलिस खात्याचा सहकारी बनला आहे. कोणत्याही जीव नसलेल्या शरीराला स्पर्श करून त्या व्यक्तीच्या आठवणी, इच्छा, अनुभव, आकांक्षा आणि गुपिते जाणून घ्यायची अलौकिक शक्ती त्याच्याकडे असते. मानव नेहमीच पोलिसांना आव्हानात्मक केसेस सोडवण्यासाठी मदत करतो; पण जेव्हा तो प्रिया नावाच्या कोमामध्ये गेलेल्या मुलीच्या हाय प्रोफाईल केसमध्ये गुंततो तेव्हा या कथेला एक नाट्यपूर्ण वळण मिळते.

या मालिकेत मुख्य भूमिकेत रोहित रॉय आणि प्रियल गोर असलेल्या या सिरीज मध्ये अनेक प्रतिभावान कलाकार आहेत.

‘वियू’चे कंट्री हेड विशाल माहेश्वरी म्हणाले, ‘प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशी विलक्षण आणि आकर्षक मूळ सीरीज सादर करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आमची आगामी ‘मेमरिज’ ही सीरीजसुद्धा तिच्या गुंतवून ठेवणाऱ्या कथेमुळे आणि तिच्यामधील मनोरंजनाच्या मुल्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवेल याची आम्हाला खात्री आहे.’

रोहित रॉय म्हणाला, ‘खूप काळात मी ऐकलेल्या कथांपैकी सर्वाधिक खिळवून ठेवणाऱ्या कथांमध्ये ‘मेमरिज’चा समावेश आहे. साहस, नाट्य, प्रणय आणि अॅक्शन या सगळ्यांनी भरलेली ही सीरीज प्रेक्षकांनाही नक्कीच पसंत पडेल, असा मला विश्वास वाटतो. कधी एकदा याच्या सिझन दोनसाठी कामाला सुरुवात करतोय असे मला झाले आहे. व्यक्तिगतदृष्ट्या डिजिटल प्रकारातील हे माझे आजवरचे सर्वोत्तम काम आहे आणि या प्रकारच्या कथांमधील बादशाह असणाऱ्या विक्रम भट यांच्याबरोबर ‘वियू’वर माझे पहिले काम सादर होत आहे, याचा मला खूपच आनंद आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी ‘मेमरिज’ सादर करताना मी खूपच उत्सुक आहे आणि भाषेचा अडसर न येता जगभरातील प्रेक्षकांना हा कार्यक्रम आवडेल असा मला विश्वास वाटतो.’

प्रियल गोर म्हणाली, ‘मेमरीज ही माझी पहिली वेबसीरीज आहे आणि नावाप्रमाणेच संपूर्ण टीमसाठी हा खूपच संस्मरणीय प्रवास आहे. याची विलक्षण संकल्पना प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवेल असा मला विश्वास वाटतो.’

‘वियू’ ही ओटीटी व्हिडीओ सेवा असून, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया, भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, बहारीन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई यांचा समावेश असलेल्या १५ बाजारपेठांमध्ये जवळपास ३० दशलक्ष डाउनलोड आहेत. २०१८च्या अखेरपर्यंत जगात सगळीकडे ‘वियू ओरिजिनल’मध्ये ७० टायटल्स आणि ९०० हून अधिक भाग स्थानिक पातळीवर निर्मिलेल्या आशयाचे असतील. त्यात केवळ भारतातून ३० हून अधिक ओरिजिनल असतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link