Next
‘हॅम्लेट’च्या कलाकारांशी रत्नागिरीत गप्पागोष्टी
BOI
Thursday, January 31, 2019 | 03:03 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : जिल्हा नगर वाचनालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या सभागृहात तीन फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता ‘हॅम्लेट- एक शिवधनुष्य’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात ‘हॅम्लेट’मधील कलाकारांशी मुलाखत वजा गप्पागोष्टींचा कार्यक्रम रंगणार आहे.

नाट्यनिर्मितीच्या प्रारंभापासून ते आतापर्यंतच्या वाटचालीतील कुतुहलपूर्ण घटना, गोष्टींचा मागोवा घेणाऱ्या या मुलाखतीमध्ये सुमित राघवन, मुग्धा गोडबोले, तुषार दळवी, सुनील तावडे, निर्माते श्रीपाद पद्माकर ही नाटकातीलच मंडळी उपस्थित राहून त्यांचा अनुभव कथन करणार आहेत. त्यांची मुलाखत कणकवलीचे (जि. सिंधुदुर्ग) प्रख्यात रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक वामन पंडित घेणार आहेत.

निर्मितीसाठी ‘हॅम्लेट’सारखे निवडलेले अत्यंत जगप्रसिद्ध आणि विश्वविख्यात नाटक, चंद्रकांत कुलकर्णींसारख्या दिग्गजाचे दिग्दर्शन, अंगावर येणारे भव्य नेपथ्य, मातब्बर अभिनेते-अभिनेत्रींच्या अभिनयाची परिमाणकारकता, देखणी- श्रीमंत निर्मिती, लक्षवेधी पार्श्वसंगीत आणि लक्षात राहणारी सुसंगत वेशभूषा अशी सारी नाट्यवैशिष्ट्ये ध्यानात घेऊन चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी नगर वाचनालय यांनी आपल्या उपक्रमांतगर्त ‘हॅम्लेट’च्या नाट्यावलोकनाचा, गप्पागोष्टीमय मुलाखतीचा हा विशेष कार्यक्रम रत्नागिरीमध्ये आयोजित केला आहे.

‘हा कार्यक्रम नि:शुल्क असून, समस्त रत्नागिरीकरांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
रविवार, तीन फेब्रुवारी २०१९
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचे सभागृह, जयस्तंभ, रत्नागिरी.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search