Next
‘ऑडिओ ब्रिज’मुळे मुख्यमंत्री, सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा व राज्य प्रशासन एकाचवेळी कनेक्ट
प्रेस रिलीज
Saturday, May 11, 2019 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय.. दुष्काळाबाबत आपल्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आपणाशी संवाद साधत आहे.’ गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील सरपंचांच्या भ्रमणध्वनीवर हा आवाज कानी पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाचवेळी ‘कनेक्ट’ करणारा ‘संवादसेतू’ सध्या दुष्काळावरील उपाय योजनांसाठी ग्रामस्थांना दिलासा देत आहेत.

आठ मे २०१९पासून मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील सरपंच, जिल्हा प्रशासनातले अधिकारी आणि राज्य प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत विविध समस्या जाणून घेत आहेत. आतापर्यंत औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांशी संवाद साधला आहे. आतापर्यंत सुमारे ३००च्या आसपास सरपंचांशी थेट संवाद मुख्यमंत्र्यांनी साधला आहे. विशेष म्हणजे संवाद सत्रात अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक ५३ सरपंचांशी संवाद साधण्यात आला.

प्रथमच ‘ऑडिओ ब्रिज’ (कॉन्फरन्स कॉलच्या धर्तीवर) तंत्रज्ञानाचा वापर करीत मोबाइलच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक आणि मुख्यमंत्री यांचा संवाद एकाच वेळी त्या संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऐकत असतात. सरपंच आपल्या गावातील पाणी टंचाई, गुरांसाठी छावण्या, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, टॅंकर्सची मागणी, रोहयोची कामे आदीबाबत मागण्या करीत असताना जिल्हा प्रशासन देखील त्या बाबींची नोंद घेत असते. सरपंचांचे म्हणणे ऐकल्यावर त्याचवेळी मुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देत असतात.


जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार या सर्वांना  एकाचवेळी निर्देश देण्यासाठी ही अनोखी पद्धत मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्याने दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्याचे काम करीत आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान पाच ते सहा सरपंचांशी मुख्यमंत्री संवाद साधतात आणि त्याचवेळी संबंधित गावाच्या समस्येवर तातडीने उपाययोजना सूचवित प्रशासनाला कालबद्ध कार्यवाहीचे निर्देशही देतात. राज्य प्रशासनात प्रथमच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी ‘संवादसेतू’ महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहे. सर्वच सरंपचांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणे शक्य होत नाही अशावेळी मुख्यमंत्री या संवाद सत्राच्या शेवटी एक व्हाटस्अॅप क्रमांक देतात आणि त्यावर केवळ दुष्काळाशी संबंधित समस्या पाठविण्याचे आवाहन करतात. या समस्यांवर ४८ तासांत कार्यवाही करण्याचे निर्देशदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात येत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search