Next
महापालिकेतील घोटाळ्यांची पोलखोल करणार - किरीट सोमय्या
BOI
Friday, January 27, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवरुन सातत्याने शिवसेनेला कोंडीत पकडणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळ्यांची ‘काळी पत्रिका’ जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
मुंबई महापालिकेतील दहा घोटाळ्यांची काळी पत्रिका जाहीर करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी मुंबईतील विक्रोळीतील सभेमध्ये म्हटले आहे. महापालिकेतील घोटाळ्यांची मालिका थांबत नसल्यामुळे घोटाळ्यांची पोलखोल करणार असल्याचे सोमय्या यांनी सभेत म्हटले आहे. पाणी, नालेसफाई, कचरा, रस्ते या सगळ्या कामांची कंत्राटे देताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. महापालिकेतील दहा घोटाळ्यांचा समावेश ब्लॅक पेपरमध्ये असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. निविदांमधील किमतीच्या तिप्पट रक्कम कंत्राटदारांना देण्यात येत असल्याचा आरोपदेखील सोमय्या यांनी केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search