Next
‘फेडेक्स’तर्फे ग्लोबल सिटिझनशिप अहवाल सादर
प्रेस रिलीज
Wednesday, May 16, 2018 | 12:20 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : फेडेक्स कॉर्पतर्फे ग्लोबल सिटिझनशिप रिपोर्ट (सीजीआर) नुकताच सादर करण्यात आला. ही कंपनी जबाबदारीने आणि स्रोतांच्या माध्यमातून जगाशी कशा प्रकारे जोडून घेते, हे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या वार्षिक अहवालात अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि माणसे या तीन महत्त्वाच्या घटकांबाबत कंपनीची धोरणे, लक्ष्य, कार्यक्रम आणि प्रगती यावर भर देण्यात आला आहे. ३१ मे २०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील नागरिकत्त्व ध्येयांसंदर्भातील कंपनीची प्रगती मांडणारी आकडेवारीही या अहवालात देण्यात आली आहे.

‘या विश्वाला एक अधिक चांगली जागा बनवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांसोबत आम्हाला व्यवसाय करायचा आहे, असे ग्राहक आम्हाला वारंवार सांगत असतात; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, जगभरातील टीम सदस्य, ग्राहक आणि समाजगटांना एका चांगल्या कॉर्पोरेट नागरिकाच्या भूमिकेतून काय द्यायला हवे, याचे नवे मापदंड स्थापित करणे, ही आमची जबाबदारी आहे, यावर आमचा विश्‍वास आहे,’ असे ‘फेडेक्स’चे अध्यक्ष आणि सीओओ डेव्हिड जे. ब्रॉन्झेक म्हणाले.

‘फेडेक्स’ने पहिल्यांदाच महसुलात ६० अब्ज डॉलरचा टप्पा पार केला. ही आर्थिक वर्ष २०१६च्या तुलनेत २० टक्क्यांची वाढ आहे. कंपनीच्या आर्थिक कामगिरीतील प्रगतीच्या माध्यमातून फेडेक्सने ४२६ दशलक्ष डॉलर्सचा लाभांश देण्यात आला. वेतन आणि टीम सदस्यांचे लाभ यासाठी २१ अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम, फेडेक्स केअर्सचा भाग म्हणून ५५ दशलक्ष डॉलर्सहून अधिक रक्कम कॉर्पोरेट धर्मादाय कामांना देण्यात आली.

फेडेक्स केअर्स ग्लोबल चॅरिटेबल गिव्हिंग कार्यक्रमाद्वारे २०२०पर्यंत जगभरात विविध संधी निर्माण करणे आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी २०० समाजगटांमध्ये २०० दशलक्ष डॉलरचा निधी गुंतवण्याचे उद्दिष्ट आहे. अवघ्या दोन वर्षांत कंपनीने जगभरातील १३४ समुदायांमध्ये १०१ दशलक्ष डॉलर्सहून अधिक निधी गुंतवला आहे. २०२०च्या लक्ष्याच्या तुलनेत अर्ध्याहून अधिक टप्पा यात पार झाला आहे.

‘फेडेक्स’ने आपल्या रिटेल ‘होल्ड फॉर पिक अप’ लोकेशन्सच्या संपर्क जाळ्यात वाढ करत कंपनीचा ई-कॉमर्स दृष्टिकोन नव्याने मांडण्यास हातभार लावला आहे. ‘लास्ट माइल ड्रिव्हन’ म्हणजेच केंद्रीय स्थानाच्या तुलनेत विविध पत्त्यांवर पॅकेजेसची डिलिव्हरी करण्यातील फरक वगळल्यास दरवर्षी अंदाजे १८ हजार मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साइडचे (CO2e) उत्सर्जन टाळता येणे शक्य आहे. दर वर्षी तीन हजार ८०० प्रवासी गाड्यांमुळे होणार्‍या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण साधारण इतकेच असते. ‘फेडेक्स’ने ‘रिड्युस, रिप्लेस, रिव्होल्युशनाइज’ हा दृष्टिकोन बाळगत आपल्या ऊर्जा बचत उप्रकमांमध्ये एकूण २.३ दशलक्ष मेट्रिक टन कार्बन उर्त्सजन कमी केले आहे.

‘फेडेक्स’चे चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर मिच जॅक्सन म्हणाले, ‘नवे, प्रयोगशील तंत्रज्ञान आणि पर्यायांचा शोध घेऊन, त्यांचा वापर करत आमचे कार्यचलन अधिक चांगले करू शकणार्‍या, त्यात क्रांती घडवून आणू शकणाऱ्या साधनांचा वापर करत आमच्या कार्यचलनामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी फेडेक्स बांधिल आहे. जगाशी जबाबदारीने आणि नवीन स्रोतांसह जोडले जाण्यात आम्हाला साह्य करणारा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे, आम्ही जिथे काम करतो आणि ज्यांच्यासाठी काम करतो अशा समुदायांवर सकारात्मक परिणाम करण्याच्या अनेक संधी आम्हाला उपलब्ध होतात.’

‘फेडेक्स’ने २०१७ या आर्थिक वर्षात एअरक्राफ्टच्या ताफ्याचे आधुनिकीकरण आणि फ्युएल सेन्स कार्यक्रमाच्या माध्यमातून १७७ दशलक्ष गॅलन्सहून अधिक जेट इंधनाची बचत केली आहे. फेडेक्स फ्युअल सेन्स टीम कंपनीच्या सर्व हवाई कार्यचलनातील कार्यक्षमता धुंडाळण्याच्या ध्येयाने झपाटली आहे. हवाई ताफ्यासोबत काम करणाऱ्या सर्व टीम सदस्यांना इंधन बचतीचा दृष्टिकोन अंगिकारण्याच्या आणि इंधनांची बचत करण्यास साह्यकारी ठरतील अशा कल्पक योजना शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘फेडेक्स’ने आपल्या ताफ्यात सुमारे ३०० इलेक्ट्रिक वाहने आणली आहेत. त्यामुळे आता त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेईकल्सची संख्या दोन हजार १०० हून अधिक झाली आहे. फेडेक्स फ्रेटने २० टेसला सेमी फुल्ली-इलेक्ट्रिक ट्रक्सची ऑर्डर दिल्याचीही घोषणा केली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link