Next
‘यक्षप्रश्न’मध्ये सुलोचना नातू प्रशालेची बाजी
BOI
Wednesday, February 07, 2018 | 01:47 PM
15 0 0
Share this article:

मंदार जोगळेकर आणि दीपा देशमुख 'यक्षप्रश्न' स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देताना. सोबत स्वाती राजे

पुणे : ‘भाषा फाउंडेशन’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली ‘यक्षप्रश्न’ ही राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पुण्यातील भारतीय विद्या भवन संस्थेच्या सुलोचना नातू प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना ‘बुकगंगा’तर्फे बक्षीस स्वरूपात पुस्तके देण्यात आली. 

‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर आणि लेखिका दीपा देशमुख हे या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दर वर्षी एक नवीन थीम घेऊन ‘यक्षप्रश्न’चे आयोजन करण्यात येते. यंदा ‘आपले खेळ; आपले खेळाडू’ या विषयावर झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत ‘विखे पाटील मेमोरिअल स्कूल’ने दुसरा तर सांगलीतील भिलवडी येथील ‘इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल’ने तिसरा क्रमांक मिळवला. बारामती येथील ‘स्वयंप्रेरणा लर्निंग सेंटर’ व पुण्याच्या ‘एस. पी. एम. हायस्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली. 

स्वाती राजेखेळांचा रंजक इतिहास, विकास, महत्त्वाचे टप्पे, रंजक किस्से, खेळाडूंची जडणघडण अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळावी, यासाठी ‘भाषा’ संस्थेतर्फे गेली सात वर्षे वेगवेगळ्या विषयांवर ‘यक्षप्रश्न’ प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात येते. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘क्विझ कॉर्प’ या संस्थेच्या सहाय्याने स्पर्धेच्या विविध फेऱ्यांची बांधणी करण्यात आली होती, अशी माहिती ‘भाषा’ संस्थेच्या अध्यक्षा स्वाती राजे यांनी दिली. 

या वेळी मंदार जोगळेकर आणि दीपा देशमुख यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘भाषा’ संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ‘मराठी भाषा ऑलिंपियाड’ या परीक्षेतील विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला. 


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search