Next
भारतीय जन संज्ञापन संस्थेमधील प्रवेशासाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ
BOI
Saturday, May 11, 2019 | 04:25 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : भारतीय जन संज्ञापन संस्थेमधील (आयआयएमसी) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश मुदत १५ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम पत्रकारिता विषयाशी संबंधित असून, प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत.

भारतीय जन संज्ञापन संस्थेच्या दिल्ली, धेनकनाल (ओडिशा), ऐझवाल (मिझोराम), जम्मू (जम्मू - काश्मीर), अमरावती (महाराष्ट्र) आणि कोट्टायम (केरळ) अशा सहा शाखा आहेत. या संस्थेमध्ये मराठी, मल्याळम, उडिया, उर्दू या प्रादेशिक भाषांमध्ये; तसेच हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

संस्थेकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर होणार असून, विस्तारित लेखी परीक्षा, गटचर्चा व मुलाखत अशा टप्प्यातून निवड केली जाणार आहे. दिनांक २५ व २६ मे २०१९ रोजी लेखी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी : www.iimc.gov.in   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search