Next
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम
वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
BOI
Wednesday, June 05, 2019 | 03:11 PM
15 0 1
Share this article:

पुणे : ‘बुद्धिवान विद्यार्थ्यांचा क्षमता विकास, विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागृत करणे, नेतृत्वगुणांचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून १९६९मध्ये सुरू झालेली ज्ञानप्रबोधिनी प्रशाला यंदा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, नऊ जून रोजी सुवर्णमहोत्सव वर्षारंभ कार्यक्रम होणार आहे,’ अशी माहिती ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे संचालक डॉ. गिरीश बापट, कार्यवाह सुभाष देशपांडे, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद नाईक, स्पर्धा परीक्षा केंद्र प्रमुख विवेक कुलकर्णी, माजी विद्यार्थी सुकाणू समितीचे शशांक चांदोरकर, आनंद आगाशे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘रविवारी अण्णा भाऊ साठे सभागृहात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणाऱ्या वर्षारंभ कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक प्रमोद चौधरी उपस्थित राहणार आहेत. या वेळी टपाल खात्याच्या वतीने एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात येणार आहे; तसेच आजी-माजी मुख्याध्यापकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. प्रेरणादायी अनुभवांचे संकलन असलेली एक स्मरणिकाही तयार करण्यात येणार आहे,’ असेही बापट यांनी सांगितले. 

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देताना ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक ड़ॉ. मिलींद नाईक व अन्य मान्यवर.

‘प्रबोधिनीत यशस्वी झालेल्या प्रयोगांचा अन्य शाळांनाही उपयोग व्हावा यासाठी निवडक उपक्रमांच्या हस्तपुस्तिकांची निर्मिती करण्यात आली असून, त्यांचे प्रकाशन या वेळी करण्यात येणार आहे. पौगंडावस्थेतील मुलांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित विषयावर देशभरातील तज्ज्ञांची परिषद नोव्हेंबरमध्ये घेतली जाणार आहे, तर भावी काळात शालेय शिक्षण कसे असावे याचे चिंतन करणारी शिक्षण परिषद पुढील वर्षी जून महिन्यात होणार आहे. या परिषदेने प्रशालेच्या सुवमहोत्सवी वर्षाची सांगता हॊईल. ज्ञानप्रबोधिनीचे गेल्या पन्नास वर्षांतील विद्यार्थी जगभरात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांचे दहा मेळावे होणार असून, त्यांच्या कार्यक्षेत्रानुसारही हे मेळावे होणार आहेत. यासाठी एका संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात आली आहे,’ असे डॉ. मिलिंद नाईक यांनी सांगितले.

(डॉ. मिलिंद नाईक यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

हेही जरूर वाचा :

 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search