मुंबई : दी हिमालया ड्रग कंपनी या भारतातील आघाडीच्या देशी वेलनेस कंपनीने, त्वचेवरील तेलकटपणा दूर करून त्वचा ताजीतवानी ठेवण्यासाठी, त्यांची नवी ‘फ्रेश स्टार्ट’ ऑईल क्लिअर फेस वॉश रेंज सादर केली आहे. हे फेसवॉश स्ट्रॉबेरी, पीच, लेमन आणि ब्ल्यूबेरी अशा फळांच्या फ्रेशनेसने युक्त आहे.
‘फ्रेश स्टार्ट’मध्ये नैसर्गिक बीड्स आहेत. हे घटक त्वचेवर अतिशय सौम्य रितीने काम करून त्वचेवरील तेलकटपणा काढून टाकतात आणि फळांमुळे त्वचेला ताजेपणा मिळतो. या नवीन रेंजमध्ये स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, पीच आणि लेमन हे चार प्रकार आहेत.
याबाबत ‘हिमालया’च्या कन्झ्युमर प्रोडक्ट डिव्हिजनचे बिझनेस डायरेक्टर राजेश कृष्णमूर्ती म्हणाले, ‘फेस वॉश विभागात बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून ग्राहकांच्या सतत बदलणार्या गरजांना समजून घेणे आणि त्यांना आरोग्यदायी त्वचा मिळवून देणे हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्वचेची सखोल स्वच्छता आणि त्वचेला मऊ, मुलायम आणि ऑईल फ्री स्पर्श यासाठी हिमालया फ्रेश स्टार्ट हा एक अनोखा पर्याय आहे. आता तरुणांना एक फ्रेश स्टार्ट, संपूर्ण दिवस, दररोज मिळेल.’

या नव्या रेंजबद्दल ‘हिमालया’च्या कन्झ्युमर प्रोडक्ट डिव्हिजनच्या मार्केटिंग विभागाचे जनरल मॅनेजर रामाराम धामिजा म्हणाले, ‘ऑईल-फ्री त्वचेसाठी चार व्हेरिएंटमधील ‘फ्रेश स्टार्ट’ ही एक आकर्षक रेंज आहे. सतत बाहेर असणार्या चोखंदळ, कॉलेजवयीन मुलींचा हा एक अगदी परिपूर्ण साथीदार आहे. कारण, त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आता त्यांना अगदी कमी वेळ पुरेसा आहे. म्हणूनच आम्ही या ब्रँडचे पॅकेजिंग आणि संपूर्ण संवादाच्या बाबतीत अगदी उत्साही आणि तरुण दृष्टिकोन बाळगला आहे. कॉलेजमध्ये जाणार्या प्रत्येक मुलीच्या स्किन केअर किटमध्ये हिमालया फ्रेश स्टार्ट ही अगदी गरजेची वस्तू बनावी, हा आमचा उद्देश आहे.’
‘हिमालया’ची ही नवीन रेंज ५० मिलीच्या पॅकसाठी ७५ रुपये आणि १०० मिलीच्या पॅकसाठी १४० रुपये अशा परवडणार्या दरात उपलब्ध आहे.