Next
वृक्षांच्या सभोवतीचे काँक्रीट व डांबर काढण्याचे आदेश
प्रेस रिलीज
Thursday, August 17, 2017 | 12:16 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत विविध ठिकाणी रस्त्याची कामे करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्यात खोडाच्या सभोवताली काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण केल्यामुळे वृक्षाच्या खोडाला व मुळांना हवा (ऑक्सीजन) व पाणी याचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेच्यावतीने शहरातील वृक्षांच्या खोडाच्या सभोवताली केलेले काँक्रीटकरण तसेच डांबरीकरण काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश देतानाच जयस्वाल यांनी वृक्षांच्याा सभोवती माती राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर वृक्षांच्या खोडाच्या सभोवताली केलेले काँक्रीटकरण आणि डांबरीकरण काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.

या कार्यवाही अंतर्गत नौपाडा प्रभाग समितीमध्ये ८११ वृक्षांच्या भोवतालची, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील २७६, कोपरी प्रभाग समितीमधील १७० असे एकूण एक हजार २५७ रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या सभोवतीचे काँक्रीटकरण आणि डांबरीकरण काढण्यााचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 
दरम्यान वृक्षांच्या सभोवतीचे काँक्रीटकरण आणि डांबरीकरण काढण्याचे काम यापुढेही सुरू ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search