Next
सुरक्षित विसर्जनासाठी पोलिसांना व्होडाफोन-आयडियाची मदत
महत्त्वाच्या ठिकाणी हवाई निरीक्षणासाठी ड्रोन्सचा वापर
BOI
Wednesday, September 11, 2019 | 03:50 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : गणेश विसर्जनासाठी प्रचंड गर्दी होणाऱ्या ठिकाणी सुरक्षितता राखण्यासाठी ड्रोन्सचा वापर करण्यात येणार असून, त्याकरता मुंबई पोलिसांना व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनी फोरजी नेटवर्क सेवेच्या माध्यमातून सहकार्य करणार आहे.

दर वर्षीच गणपती विसर्जनासाठी जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी आणि चेंबूरमधील आशिष तलाव या ठिकाणी जवळपास १५ लाखांहून अधिक भाविक जमतात. या ठिकाणी यंदा हवाई निरीक्षणासाठी ड्रोन्सचा वापर करण्यात येणार असून, या ड्रोन्समध्ये हाय डेफिनिशन व्हिडिओ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या अत्याधुनिक नियंत्रण कक्षात याद्वारे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार असून, त्यासाठी व्होडाफोनच्या फोरजी नेटवर्कचा वापर करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना व्होडाफोन-आयडिया लिमिटेड, मुंबई सर्कलचे व्यवसाय प्रमुख सुनिल तोलानी म्हणाले, ‘मुंबईत साजरा होणारा गणेशोत्सव हा सर्वांत मोठा सण आहे. या शहरात आमचे प्रमुख कार्यालय असल्यामुळे मुंबई पोलिसांना हे शहर सुरक्षित ठेवण्याच्या त्यांच्या कामात पाठिंबा देणे आमचे कर्तव्या आहे. मुंबई पोलिसांना त्यांच्या नियंत्रण कक्षातच लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता यावे, यासाठी व्होडाफोनचे फोरजी नेटवर्क आम्ही वापरणार आहोत. आम्हा ला आशा आहे की, या माध्यजमातून मुंबईकर अधिक सुरक्षित विसर्जनाचा अनुभव घेऊ शकतील.’

मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ता म्हणाले, ‘व्होडाफोन आयडियाने केलेल्या सहकार्याबद्दल मुंबई पोलिस कृतज्ञ असून, भविष्यातही असे सहकार्य कायम राहील, अशी आम्हाला आशा आहे. दर वर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी खूप गर्दी होते. अशा परिस्थितीत, सर्व वाहतूक व विसर्जन प्रक्रिया सुरळीत रहावी, यासाठी पुरेशी व्यवस्था व यंत्रणाही उपलब्ध आहे. तरीही, गर्दीवर जवळून लक्ष पुरवणे, विशेषतः चौपाट्यांवरील गर्दी सावरणे आव्हान ठरते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search