Next
‘जेट एज्युजेटर’ कार्यक्रमाला पुण्यात वाढता प्रतिसाद
प्रेस रिलीज
Saturday, August 18, 2018 | 12:47 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘जेट एअरवेज’ तर्फे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या तरुण व महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना ‘एज्युजेटर’ कार्यक्रमाद्वारे मदत केली जाते. २००९ पासून सुरू असणाऱ्या या उपक्रमाला मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद या महानगरांसह अहमदाबाद, बडोदा, पुणे, राजकोट अशा शहरांतही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘एज्युजेटर’ कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या गेल्या चार वर्षांमध्ये ३५ टक्क्यांनी वाढली आहे. 

प्रवाशांना वैविध्यपूर्ण व दर्जेदार अनुभव देणे, हा जेट एअरवेजच्या सेवेचा गाभा आहे. हा विचार मध्यवर्ती ठेवून, विद्यार्थी वर्गाचा प्रवास सुरळीत होण्यासाठी त्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने कंपनी त्यामध्ये दरवर्षी आवश्यक बदल करते व यातून मिळणाऱ्या लाभांमध्ये वाढ करते. ‘एज्युजेटर’ कार्यक्रमासाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांकडे केवळ स्टुडंट व्हिसा असणे व विद्यापीठाचे स्वीकृती पत्र असणे गरजेचे आहे. 

‘एज्युजेटर’मध्ये, अंतिम ठिकाणी पोहोचेपर्यंत ‘टॅग्ड व चेक्ड-इन’ ६९किलोंपर्यंत अपवादात्मक बॅगेज अलाउन्स, सात हजार ५०० जेपीमाइल्स, बेस फेअरवर आठ टक्के सवलत, तसेच भागीदारांकडून, ‘कॉक्स अँड किंग्स’कडून फॉरेक्स कार्ड, युनिकनेक्टकडून विशेष कॉलिंग रेट असलेले मोफत सिम कार्ड व जेट एस्केप्स ट्रॅव्हल / हॉलिडे पॅकेजवर दहा टक्क्के सवलत असे विविध लाभही दिले जातात.

हा कार्यक्रम अधिकाधिक लोकप्रिय व्हावा, या हेतूने, वर नमूद केलेल्या फायद्यांप्रमाणेच, जेट एअरवेजने ‘एज्युजेटर’साठी अर्ज करणे व बुकिंग करणे, ही संपूर्ण प्रक्रिया सोपी केली आहे. केवळ तीन सोपे टप्पे पूर्ण करून विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो.  त्यानंतर ७२ तासांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य ते एज्युजेटर लाभ समाविष्ट केलेले अपडेटेड तिकीट मिळते.

‘एज्युजेटर’ कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला असून, जेट एअरवेजच्या २१ कोडशेअर पार्टनरद्वारे चालवल्या जाणाऱ्या विमानांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये, एतिहाद एअरवेज, केएलएम रॉयल डच एअरलाइन्स, डेल्टा एअर लाइन्स, कंटास व व्हर्जिन अटलांटिक यांचा समावेश आहे. त्याद्वारे उत्तर अमेरिकेतील दोनशेहून अधिक ठिकाणे, युरोपातील आणि पूर्वेकडील शंभरपेक्षा जास्त ठिकाणी सेवा दिली जाते. या वर्षी भारतातील पाच लाख विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने परदेशी जाण्याची शक्यता आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search