Next
जगप्रसिद्ध ‘हॅम्लेज’चे रिलायन्सकडून अधिग्रहण
खेळण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश
BOI
Saturday, May 11, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : जगातील सर्वात जुने तब्बल २५९ वर्षांपूर्वी स्थापन झालेला जगप्रसिद्ध खेळण्यांचा ब्रँड ‘हॅम्लेज’ रिलायन्सने विकत घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सहाय्यक रिलायन्स ब्रँडसने ‘हॅम्लेज’ची मालकी असलेल्या हाँगकाँग स्थित ‘सी बॅनर इंटरनॅशनल होल्डिंग्ज’मधील शंभर टक्के समभाग खरेदी करण्यासाठी करार केला आहे. यामुळे रिलायन्सचा खेळण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश झाला आहे. तब्बल ८८.५ द्शलक्ष डॉलर्सचा हा व्यवहार आहे.

‘हॅम्लेज’ हे सुमारे २५९ वर्षांपूर्वी १७६० मध्ये ब्रिटनमध्ये स्थापन झालेले जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे खेळण्यांचे दुकान कालांतराने जगप्रसिद्ध कंपनी म्हणून नावारूपाला आले. गेल्या दोन शतकांपेक्षा अधिक काळ,‘हॅम्लेज’ची सर्वोत्कृष्ट खेळणी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहेत. कंपनीने आपल्या रिटेल नेटवर्कचा थिएटर आणि मनोरंजन क्षेत्रातही विस्तार केला आहे.

जगभरात, १८ देशांमध्ये हॅम्लेजची १६७ दालने असून, रिलायन्सकडे भारतातील हॅम्लेजची मास्टर फ्रँचाइजी होती. त्याद्वारे देशभरातील २९ शहरांमध्ये ८८ दालने चालवली जातात. आता या अधिग्रहणामुळे, रिलायन्सला जागतिक पातळीवरील खेळण्यांच्या उद्योगात मोठी भूमिका मिळेल आणि ती मोठी कंपनी म्हणून उदयाला येईल.

या नवीन घडामोडीबद्दल प्रतिक्रिया देताना ‘रिलायन्स ब्रँड’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन मेहता म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून, आम्ही भारतात ‘हॅम्लेज’ ब्रँडखाली किरकोळ खेळणी विक्रीमध्ये दमदार यश साध्य केले आहे. आता जागतिक पातळीवर रिलायन्स या क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी म्हणून आपले स्थान पक्के करेल. हे एक खूप जुने स्वप्न पूर्णत्वास गेले आहे.’ 

हॅम्लेजने १८८१ मध्ये लंडनच्या रीजेंट स्ट्रीटवर त्यांचे फ्लॅगशिप स्टोअर उघडले. हे मुख्य स्टोअर सात मजल्यांवर ५४ हजार चौरस फुट जागेत पसरले असून, येथे पन्नास हजारांहून अधिक खेळणी उपलब्ध आहेत. हे लंडनमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे आणि जगभरातील लोक हे खेळण्यांचे दुकान पाहण्यासाठी आणि येथे खरेदी करण्यासाठी येतात. दर वर्षी ५० लाखांहून अधिक लोक या स्टोअरला भेट देतात.    

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search