Next
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा १६ जून रोजी होणार
लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षेच्या तारखेत बदल
BOI
Friday, March 29, 2019 | 04:29 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) इयत्ता दहावी राज्यस्तर परीक्षेत निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तर परीक्षा लोकसभा निवडणूक कामकाजामुळे रविवार, १२ मे ऐवजी रविवार, १६ जून २०१९ रोजी होणार आहे. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एप्रिल २०१९ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एन. सी. ई. आर. टी. (NCERT) यांच्या www.ncert.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

इयत्ता दहावीसाठी राज्यस्तरावर घेण्यात आलेली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा चार नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातून ८६ हजार २८१ विद्यार्थी बसले होते. राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून ३८७ विद्यार्थी कोटा ठरवण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या ३८७ विद्यार्थ्यांची निवड यादी एक मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. तथापि एन. सी. ई. आर. टी. कडून महाराष्ट्रासाठी २०१८-१९ व २०१९-२० साठी ७७४ विद्यार्थी कोटा देण्यात आला आहे. सर्वसाधारण गटातील ३९१, इतर मागास वर्गीय संवर्गातील २०९, अनुसूचित जाती (SC) ११६ व अनुसूचित जमाती (ST) ५८ अशा एकूण ७७४ विद्यार्थ्यांचा कोटा देण्यात आलेला आहे. संबंधित संवर्गातील समान गुणांचे विद्यार्थी समाविष्ट करून ७७५ विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संबंधित संवर्गात अपगांसाठीचे चार टक्के आरक्षण समाविष्ट आहे. ही सुधारित निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://nts.mscescholarshipexam.in संकेतस्थळावर १९ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. 

ज्या विद्यार्थ्यांची निवड जात किंवा अपंगत्व आरक्षणातून झालेली आहे, त्यांनी प्रमाणपत्राची सत्य प्रत प्रवेशपत्रासोबत एन. सी. ई. आर. टी. नवी दिल्ली यांना सादर केल्याशिवाय त्यांची निवड कायम समजण्यात येणार नाही.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search