Next
राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये माधुरी तारमळेला रौप्यपदक
BOI
Monday, May 13, 2019 | 12:09 PM
15 0 0
Share this article:

शहापूर : तमिळनाडू सिलंबम असोसिएशन व इंडियन सिलंबम फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तमिळनाडूतील इरोड या शहरात टेक्स वॅली चितोड येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धेत शहापूर तालुक्यातील माधुरी तारमळेने रौप्यपदकाची कमाई केली. 

चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतील एकूण ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे आयोजन इंडियन सिलंबम फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. एम. राजेंद्रन (IAS) यांनी केले होते. स्पर्धेत महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे अरुण सारवान यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता. या संघात महाराष्ट्राच्या १६ स्पर्धकांचा समावेश होता. 

स्पर्धेत महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनच्या सेक्रेटरी खुशबू चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील स्पर्धक माधुरी हिरामण तारमळे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून ५० ते ६० वजनी गटात रौप्यपदक पटकावले. तिला फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. एम. राजेंद्रन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या माधुरीने एमए इंग्लिशमधून शिक्षण पूर्ण केले असून, आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर थ्रीडीएएन (थर्डन) ब्लॅक बेल्टही पटकावले आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबावेत म्हणून तिने ठाणे जिल्हा स्वयंसिद्धा संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमार्फत तब्बल २५ हजारांहून अधिक मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे. तिच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल तिला अनेक पुरस्कारांनीदेखील गौरविण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 128 Days ago
There are dozens of Shahapurs .
0
0

Select Language
Share Link
 
Search