Next
कृत्रिम पाऊस पाडण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
प्रेस रिलीज
Wednesday, May 29, 2019 | 01:23 PM
15 0 0
Share this article:

सौजन्य : गुगलमुंबई : राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी व पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाउड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

२८ मे २०१९ रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात हा निर्णय झाला. राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थ‍िती असून, बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पर्जन्यमानात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपायांचा अवलंब करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. कृत्रिम पर्जन्यमान हा त्यातलाच एक भाग आहे. सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याने मंत्रिमंडळाने एरियल क्लाउड सीडिंग करून पर्जन्यवाढ करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी ३० कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली आहे.

दुष्काळ निवारण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

परदेशात एरियल क्लाउड सीडिंगच्या प्रयोगातून २८ ते ४३ टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान वाढल्याचे आढळून आले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात क्लाउड सीडिंगच्या माध्यमातून पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे सी बॅंड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे.

सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असल्यास अशा वेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास पर्जन्यमान वाढण्यास मदत होऊ शकते. त्याचा जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांनाही लाभ होईल; तसेच भूगर्भातील पाणीसाठ्यातही वाढ होण्यास मदत होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 104 Days ago
Why did they wait until the disaster is on the door-step ? By Noveber last year , it was clear that the rainfall was below average . To look into the needs of the future is also necessary . After all , there will be elections in the future . Why not think of them ?
0
0

Select Language
Share Link
 
Search