Next
‘कोरिया कल्चर अँड टुरिझम फेस्टिवल’चे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, April 12, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनतर्फे (केटीओ) मुंबईकर आणि आणि इच्छुक प्रवाशांसाठी मुंबईतील हाय स्ट्रीट फिनिक्स येथे १३ आणि १४ एप्रिल २०१९ रोजी . ‘कोरिया कल्चर अँड टुरिझम फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये दक्षिण कोरियातील अन्नपदार्थ, संस्कृती, संगीत, पर्यटन आदी अनुभवांचे प्रदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर मुंबईच्या पीवीआर जुहू भागात कोरिया कल्चर सेंटरद्वारे कोरिया मूव्ही विकएंडही आयोजित केला आहे.

फेस्टिव्हलच्या प्रमुख आकर्षणांमध्ये सर्वोत्तम कोरियन कलाकारांचा समावेश असून, यात इनटूइट, अलेक्झांड्रा, क्वीन अँड गॅम्बलर्स क्रूचा सहभाग असेल. इथे भेट देणाऱ्यांना पारंपरिक कोरियन पेहराव-हानबोक वेअरिंगचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. या पेहरावाच्या नावात कोरियन वर्ण हँगेउलचा समावेश आहे. मास्क पेटिंग, फेस पेंटिंग, फूड टेस्टिंग म्हणजेच बिबिमबाप (भाताचा प्रकार) आणि सेजेओंग्वा (दालचिनीयुक्त पेय) या अस्सल कोरियन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे; तसेच एटी सेंटर आयोजित स्थानिक कोरियन नाश्त्याचे प्रकारही चाखता येणार आहेत.

या ठिकाणी हल्लयु झोन, परफॉरमन्स झोन, एक्सपिरिअन्स झोन, व्हीआर अँड कॅलिग्राफी झोन, फोटो झोन, गेम झोन, फूड झोन, रिजनल टुरिझम झोन आणि रिडम्पशन झोन तुम्हाला ‘इमॅजीन युअर कोरिया’ (तुमच्या मनातील कोरियाची कल्पना) असे काही निवडक झोन तयार करण्यात आले आहेत. हा फेस्टिव्हल सर्वांसाठी मोफत आहे. भारतीय ट्रॅव्हल एजंट या इव्हेंटमध्ये उपस्थित राहणार असून, या वेळी कोरिया ट्रॅव्हल पॅकेजवर विशेष ऑफर्सही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी भेट देणाऱ्यांना आरटीओ झोनमध्ये स्टँप टूर घेऊन मोफत के-फेस्ट मर्कंडाइज सोबत नेता येणार आहेत.

या विषयी बोलताना कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनचे संचालक क्वॉन जाँग सूल म्हणाले, ‘आमच्यासाठी कायमच भारत हा एक महत्त्वपूर्ण देश आहे. नियमित प्रवासी तसेच ‘एमआयसीई’ बाजारासाठी दक्षिण कोरियाकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आम्हाला आशा वाटते की, न लक्षात घेतलेल्या भरपूर क्षमता आहेत. हा दोन दिवसांचा महोत्सव भारतीय पर्यटकांचा दक्षिण कोरियात प्रचार-प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आम्ही भारतीय पर्यटकांमध्ये दक्षिण कोरियाचा प्रचार व्हावा म्हणून गुंतवणूक करू. हा करार आमच्या या प्रयत्नाला हातभार लावेल. भारतीय प्रवाशांसाठी कोरिया ही प्रथम पसंती ठरावी यासाठी आउटबाउंड टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियासोबत दीर्घकालीन भागीदारीसाठी आम्ही उत्सुक आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search