Next
अहमदनगर जिल्हा मित्रमंडळातर्फे रविवारी स्नेहमेळावा
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
BOI
Thursday, September 20, 2018 | 12:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : अहमदनगर जिल्हा मित्रमंडळातर्फे मुळचे अहमदनगरचे रहिवासी असलेले, मात्र शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिवाजीनगर येथील ‘दी शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन, डीएसटीए हाऊस येथे  हा  मेळावा होणार आहे. 

या वेळी इयत्ता दहावी, बारावी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि कला, क्रीडा आणि सामाजिक आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण असतील,तर पुण्याचे पोलीस सहआयुक्त शिवाजीराव बोडखे आणि सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे हे प्रमुख पाहुणे असतील. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने अहमदनगरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे प्रमुख भास्करराव शेळके, अध्यक्ष उत्तमराव करपे, खजिनदार संदीप तुवर यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : साहेबराव खामकर : ९६२५३ ४३४३४

कार्यक्रमाविषयी 
अहमदनगर जिल्हा मित्रमंडळ स्नेहमेळावा
स्थळ : ‘दी शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन, डीएसटीए हाऊस, शिवाजीनगर एस. टी. स्टँडसमोर, पुणे 
वेळ : रविवार, ३० सप्टेंबर, सकाळी १० वाजता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kisan Bhau Hase About 359 Days ago
Best of luck. Daily Yuvavarta, Sangamner
0
0
Engr.Vilas Nanabhau Thube About 359 Days ago
Miss.Shreya Vilas Thube Successful wth. S.S.C.Board 92%.pl.take name in list.please.pl.contact Mobl.No.9423465984
0
0

Select Language
Share Link
 
Search