Next
‘अल्पसंख्याकांच्या योजनांची जनतेला माहिती द्या’
प्रेस रिलीज
Monday, February 19 | 05:55 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘समाजाचा प्रत्येक घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे. मोदी सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी अर्थसंकल्पात भरघोस वाढ केली असून, सरकारच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ होण्यासाठी अल्पसंख्यांक समाजाला त्याची माहिती देण्याचे काम मुस्लिम महिला कार्यकर्त्यांनी करावे,’ असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी (१७ जानेवारी) केले.

भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चातर्फे राज्यभरातील मुस्लिम महिलांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर नक्वी बोलत होते. या वेळी अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी, मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस सिकंदर शेख व ऐजाज देशमुख, मोर्चाच्या महिला प्रमुख रिदा रशिद, भाजप मुंबई उपाध्यक्ष हैदर आझम व डॉ. नाहिदा शेख उपस्थित होते.

नक्वी म्हणाले की, ‘काही राजकीय शक्तींना वाटते की मुस्लिम समाज मागासलेला रहावा व सतत भितीच्या छायेत रहावा. जेणेकरून त्यांची मते मिळवता येतील; पण मोदी सरकारने ‘तुष्टीकरणाशिवाय सशक्तीकरण’ या धोरणानुसार अल्पसंख्याकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक विभागासाठी स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक सुमारे पाच हजार कोटींची तरतूद केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही अल्पसंख्य समाजासाठी काम करत आहे. अर्थसंकल्पातील वाढीव निधी अल्पसंख्य समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी उपयोगी पडेल.’

नक्वी पुढे म्हणाले की, ‘गेल्या तीन वर्षांत अल्पसंख्य समाजातील दोन कोटी ४५ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. यंदा दीड कोटींपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. अल्पसंख्य समाजातील विद्यार्थी आयएएस व्हावेत यासाठीच्या प्रयत्नांना यश आले आहे. अल्पसंख्य समाजाचे शिक्षण व रोजगार यावर सरकारचा भर आहे.

‘तिहेरी तलाकचा संबंध धर्माशी नसून, ती एक कुप्रथा आहे. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचे विधेयक प्राधान्याने मंजूर केले जाईल. तिहेरी तलाकवर जगातील बहुतांश मुस्लिम देशांमध्ये बंदी असून भारतातही त्यावर बंदी घालणे आवश्यक आहे,’ असे नक्वी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link