Next
पर्यटनासाठी ‘ट्रॅव्हलयारी’ची ‘प्लान हॉलिडे’ सुविधा
प्रेस रिलीज
Tuesday, April 23, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘ट्रॅव्हलयारी’ या भारताच्या आघाडीच्या बस बुकिंग मंचाने पर्यटकांना त्यांच्या अनुकूलतेनुसार सुट्टीचे आयोजन करता यावे यासाठी ‘प्लान हॉलिडे’ ही नवीन सुविधा सुरू केली आहे. मॅंटीस टेक्नॉलॉजीज या ‘ट्रॅव्हेलयारी’च्या जनक कंपनीने हे फीचर आणण्यासाठी मीट्रिपिंग ट्रॅव्हेल सर्च इंजिनसोबत हातमिळवणी केली आहे. ही सुविधा वापरकर्त्यांना त्यांच्या व्यक्तीगत प्राथमिकता आणि बजेट अनुसार आपले पसंतीचे प्रवास स्थळ निवडण्यास मदत करणार आहे. 

या विषयी ‘ट्रॅव्हलयारी’चे उत्पादन आणि डिजिटल मार्केटिंग उपाध्यक्ष अमितकुमार सिंह म्हणाले, ‘बहुतांश वेळा पर्यटक जागा आणि रस्त्याची योग्य माहिती नसल्यामुळे आणि आयोजन न करता आल्याने प्रवासाचा कार्यक्रम रद्द करतात. या सुविधेसह या समस्येवर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हे फीचर पर्यटकांचे बजेट, प्रवासाचा उद्देश, प्रवास कालावधी तसेच तत्कालीन हवामान वगैरे पर्यावरणीय परिबाळांचा विचार करून अगदी अनुकूल असे आयोजन करून देते.’

‘स्थापना झाल्यापासून ‘ट्रॅव्हलयारी’ने प्रवास क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल उपाय उपलब्ध करून दिले आहेत. या महिन्याच्या सुरूवातीस त्यांनी ‘मॉडिफाय बुकिंग’ फीचर सादर केले. या फीचरच्या माध्यमातून प्रवासी डिलिव्हरीची माहिती, प्रवाशाची माहिती यात तिकिटाचे आरक्षण झाल्यानंतरदेखील बदल करू शकतात. आता सादर केलेल्या ‘प्लान हॉलिडे’ फीचरद्वारे, प्रवास कटकटींनी मुक्त आणि आनंददायी करण्याचे ‘ट्रॅव्हेलयारी’चे उद्दिष्ट आहे,’ असे सिंह यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search