Next
भारतरत्न आचार्य विनोबा गाथा
BOI
Monday, November 26, 2018 | 10:01 AM
15 1 0
Share this story

आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार येथील समाधीवर त्यांच्याच हस्ताक्षरात ‘एक दिन जाना है भाई, मेरे जाने के बाद पढत रहो गीताई’, असा मजकूर कोरलेला आहे. विनोबाजींनी गीताईतून जे मार्गदर्शन केले आहे, ते सतीशचंद्र तोडणकर यांनी संपादन स्वरूपात ‘भारतरत्न आचार्य विनोबा गाथा’मधून सादर केले आहे.

आचार्य विनोबांच्या मंगल विचारांनी या गाथेला सुरुवात होते. विनोबांनी भारताचा धर्मविचार सांगताना स्पष्ट केलेला धर्माचा अर्थ, हिंदू धर्म, ऋग्वेद, ईश्वर, मूर्तिपूजेचे रहस्य, उपासना, मंदिरे, वर्ण व्यवस्था, गो-उपासना यात आला आहे. धर्माला धरूनच अध्यात्म, वेद, उपनिषदांचा अभ्यास यांची माहिती दिली आहे.

विनोबाजींनी धुळ्यातील कारागृहात दिलेल्या गीता प्रवचनांचा यात समावेश आहे. महात्मा गांधी यांनी गीतापठणात पत्र लिहून सूचना विचारल्या होत्या. त्याला विनोबाजींनी दिलेले उत्तरही आहे. सप्तशती, शंकराचार्यांचे चिंतन, विष्णुसहस्रनाम, संतांची शिकवण, जगातील सर्व धर्मांचे सार, गांधी-विनोबा दर्शन आदी प्रकरणातून विनोबा भावे यांचे चरित्र, कार्य, लेखन, विचार समजतात.          

       
प्रकाशन : शुभदा पब्लिशिंग हाउस
पृष्ठे : ३१८
मूल्य : ४०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link