Next
‘सहकारी गृहनिर्माण संस्था लोकचळवळ व्हावी’
प्रेस रिलीज
Tuesday, September 11, 2018 | 02:03 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासद, अन्य सदस्यांबरोबर दीर्घ काळ वास्तव्यास असतात. सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांमध्ये शांतता नांदावी आणि सौहार्दपूर्ण संबंध असावे, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था लोकचळवळ व्हावी,’ अशी अपेक्षा पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघातर्फे ‘तंटामुक्त गृहनिर्माण सोसायटी’ या विषयावर पत्रकार भवन येथील सभागृहात आज एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी फेडरेशनच्या सिंहगड रोड शाखेचेही उद्घाटन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर, नगरसेविका मंजुषा खर्डेकर, महासंघाच्या सिंहगड रोड शाखेचे अध्यक्ष विकास वाळुंजकर, सचिव मनिषा कोष्टी  उपस्थित होते.

या प्रसंगी पालकमंत्री बापट म्हणाले, ‘तंटामुक्त गाव या योजनेच्या धर्तीवर तंटामुक्त सोसायटी उपक्रम राबविण्यात यावा. सुमारे अठरा हजार सहकारी गृहनिर्माण संस्था शहराच्या विकासामध्ये योगदान देत आहेत. पूर्वीच्या काळातील वाडा संस्कृती जाऊन आता त्याची जागा गृहनिर्माण संस्थांनी घेतली आहे. त्यातून सभासदांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्व सभासदांनी एकत्र येऊन सहकार्याने समस्या सोडवाव्यात.’

‘सार्वजनिक उत्सवांमध्ये संस्थांमधील सभासद मोठया संख्येने एकत्र आल्यास आपापसातील मतभेद दूर होण्यास मदत होईल. संचालक मंडळामध्ये महिलांचे प्रमाण वाढल्यास संस्थेचे कामकाज अधिक चांगल्याप्रकारे होईल. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे करांसंबंधी विविध प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. विकास वाळुंजकर यांनी तंटामुक्त सोसायटी या संकल्पनेची माहिती दिली. सहकार खात्याने पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर तंटामुक्त सोसायटी योजना राबविल्यास उपनिबंधक पातळीवरील कामाचे ओझे निम्याने कमी होईल,’ असा दावा त्यांनी केला.

‘संस्थांमधील प्रश्न संस्थांनीच सोडवावे, यासाठी सहकार खात्याने तयार केलेल्या आदर्श उपविधीचा प्रभावी वापर करावा,’ असेविद्याधर अनासकर यांनी सांगितले.

मंजुश्री खर्डेकर, रवींद्र सिन्हा, दादासाहेब पवार, विजय सागर, बाळासाहेब तावरे हे या परिसंवादात सहभागी झाले होते. समीर रूपदे यांनी सूत्रसंचालन केले. मनिषा कोष्टी यांनी आभार मानले. या परिसंवादाला जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search