Next
बाइकवरून ‘सुवर्ण चतुष्कोन’
BOI
Wednesday, March 22, 2017 | 05:31 PM
15 17 0
Share this article:

शरद काळे आपल्या बाइकसहअहमदनगर : मित्रांसोबत बाइकवरून ‘रोड ट्रिप’ला जाणे ही आता फारशी वेगळी बाब उरलेली नाही. कन्याकुमारी, लेह-लडाखसह सह्याद्रीतील कडेकपाऱ्यांतून ‘बाइक राइड’चा अनुभव अनेक तरुणांनी घेतला असेल. आपण, आपली बॅक-पॅक आणि आपली जिवाभावाची बाइक असा एकट्याने केलेला शेकडो किलोमीटर्सचा प्रवास आयुष्यभरासाठी जिद्दीची, वेगाची आठवण ठेवून जातो. असाच एक अनुभव अहमदनगरचे ५० वर्षीय ‘तरुण’ शरद काळे-पाटील यांनी घेतला. त्यांनी मुंबई-दिल्ली-कोलकाता-चेन्नई हा देशाच्या ‘सुवर्ण चतुष्कोना’चा प्रवास आपल्या बाइकवरून अवघ्या ८८ तासांत पूर्ण केला आहे
.
नगरच्या या ‘टफेस्ट रायडर’ने मुंबई ते दिल्ली, तेथून कोलकाता, कोलकात्यावरून चेन्नई आणि मग पुन्हा मुंबई असा सहा हजार किलोमीटरचा प्रवास आपल्या दुचाकीवरून अवघ्या  ८८  तासांत पूर्ण करून एक वेगळाच विक्रम केला. ते मंगळवारी (२१ मार्च) नगरमध्ये दाखल झाले. 
१६ मार्च ते १९ मार्च या काळात त्यांनी भारतातील १३ राज्यांमधून प्रवास केला. या चार दिवसांत अखंडपणे गाडी चालवत त्यांनी भारतातील चारही दिशांना असणाऱ्या शहरांना भेट देऊन आपला ‘चौकोनी’ प्रवास पूर्ण केला.

‘ह्योसंग अकिला जीव्ही २५०’ या ‘साउथ कुरियन क्रूझर’ बाइकरूपी सोबतिणीसह त्यांनी भारतभ्रमण केले. यात त्यांनी देशातील भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या असणाऱ्या चार शहरांना भेट दिली. 

काळे - पाटील यांनी १६ मार्च रोजी सकाळी सहा वाजता या ‘सुवर्ण चौकोना’च्या प्रवासाला मुंबईमधून सुरुवात केली. या वेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख उपस्थित होते. याच दिवशी रात्री पावणेबाराच्या सुमारास काळे-पाटील गुडगाव  येथे पोहचले. तेथून लगेचच त्यांनी कोलकात्याकडे कूच केले. १७ मार्चच्या रात्री आठ वाजता ते कोलकाता येथे पोहोचले व लगेचच चेन्नईच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. १८ तारखेच्या मध्यरात्री अडीच वाजता काळे-पाटील यांनी चेन्नई गाठले आणि तेथून आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. १९ तारखेच्या मध्यरात्री १२.३० च्या सुमारास मुंबईमध्ये दाखल होऊन ‘टफेस्ट रायडर’ काळे-पाटील यांनी आपला हा विक्रमी प्रवास पूर्ण केला. दोन दिवस मुंबईत विश्रांती घेऊन मंगळवारी सकाळी ते नगरकडे निघाले. 

बुधवारी, २२ मार्चला त्यांनी आपल्या मित्रमंडळींना प्रवासादरम्यानच्या अनुभवांचे कथन केले. अटलजींचा ‘भारत जोडो’ हा संदेश अधोरेखित करणे हा त्यांच्या प्रवासाचा उद्देश होता.
 
15 17 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kolse Ravindra About
Really a tough fest rider.
0
0
Shaikh Abduĺ About
You are best and congratulations king of roads
0
0
Surendra Chandole About
Congratulations sir
0
0
गणेश पालवे About
आपल्या जिद्दीच कौतुक अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे खुप खुप अभिनंदन साहेब
0
0
Adv.Devlalkar About
Sharadrao congrats.what a funstatic tour. We proud you
0
0

Select Language
Share Link
 
Search