Next
‘छत्रीवाली’च्या शीर्षकगीताला तरुणाईकडून प्रतिसाद
प्रेस रिलीज
Saturday, September 29, 2018 | 11:19 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकवर्गातून भरभरून दाद मिळत आहे. अश्विनी शेंडे-बगवाडकरच्या लेखणीतून हे शीर्षकगीत तयार झाले असून, नीलेश मोहरीर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. ‘टिकोजीराव ऐदी... आड येते ही छत्रीवाली’ असे धमाल शब्द असलेल्या या गाण्याला तरुणाईकडून पसंती मिळत आहे.

‘स्टार प्रवाह’वरील मालिकांची शीर्षकगीते नेहमीच खास असतात. ‘अग्निहोत्र’, ‘पुढचं पाऊल’, ‘गोठ’, ‘नकुशी’, ‘नकळत सारे घडले’, ‘ललित २०५’, ‘विठुमाऊली’ या आणि अशा अनेक मालिकांच्या शीर्षकगीतांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या यादीत आता ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या टायटल साँगचीही भर पडली आहे. नायक आणि नायिकेतल्या लव्ह-हेट नात्याचे नेमकेपणाने वर्णन आणि चित्रण या गाण्यातून करण्यात आले आहे.

या गाण्याविषयी सांगताना नीलेश मोहरीर म्हणाले, ‘मालिकेच्या नावातच खूप गंमत आहे. बरेचदा मालिकेच्या नावात गाण्याचा पदर दडलेला असतो. अश्विनी शेंडे-बगवाडकरने खूप उत्तम पद्धतीने हे शीर्षकगीत लिहिले आहे; तसेच बेला शेंडे आणि जयदीप बगवाडकरनेही तितक्याच हलक्याफुलक्या पद्धतीने ते गायले आहे. या गाण्यातून नायक-नायिकेचा स्वभाव, व्यक्तिरेखा नेमकेपणाने व्यक्त होते. माझ्या आजपर्यंतच्या गाण्यांमधले हे खूप वेगळे शीर्षक गीत आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search