Next
कामावरून कमी केल्याचा लढा कामगारांनी १६ वर्षांनी जिंकला
प्रेस रिलीज
Wednesday, July 10, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

निकालानंतर कामगारांशी चर्चा करताना अॅड.  संतोष म्हस्के

पुणे : लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीस (पूर्वीची धनेश ऑटो इलेक्ट्रिकल लिमिटेड) कंपनीतून बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढलेल्या २१ कामगारांना कामगार न्यायालयातील लढ्यात १६ वर्षांनी यश मिळाले आहे. या कामगारांना कामावर घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश दिल्याची माहिती कामगारांच्या बाजूने लढा देणारे वकील अॅड. संतोष म्हस्के यांनी ही माहिती दिली.

या कंपनी व्यवस्थापनाने महाराष्ट्र लेबर युनियनला हाताशी धरून २१ कामगारांना १५ सप्टेंबर २००३ पासून नोकरीवरून कमी केले होते. या कामगारांना उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. न्यायालयीन लढ्यासाठीही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष म्हस्के यांनी विना मानधन या कामगारांचा न्यायालयीन लढा सलग १६ वर्षे लढला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायमूर्ती मधुरा मुळीक यांनी कंपनीचा कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय बेकायदेशीर आणि अनुचित कामगार प्रथांचा ठरवून सर्व २१ कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले. 

अॅड  संतोष म्हस्केया २१ कामगारांना कमी केल्याच्या दिवसापासून आजपर्यंतचे निम्मे वेतन, अनुषंगिक आर्थिक फायदे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत; तसेच कंपनी व्यवस्थापनास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडाची पाच हजार रुपये रक्कम कमी केलेल्या प्रत्येक कामगारास देण्याचा आदेशही दिला आहे. या निर्णयामुळे २१ कामगारांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

कामगारांतर्फे अॅड. संतोष म्हस्के यांनी, तर कंपनीतर्फे अॅड. मनीषा मोरे यांनी काम पाहिले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 101 Days ago
This show that it is possible to fight for justice . It is necessary to keep up the struggle . But this is so , always true .,in all walks of life , all over the world . Best wishes .
0
0
ADV Santosh mhaske About 102 Days ago
Kamgarnachya varil anyway akher sampala. Kamgarnachya andat mala Samadhan watale.pradhirgh 16 varshacha Sangharsh kshanasathi dolyasamor ubha Rahat ahe. Jay kamgar..Jay sanvidhan..Jay Jagat.
0
0

Select Language
Share Link
 
Search