Next
सुखकर्ता दुःखहर्ता
BOI
Wednesday, February 06, 2019 | 05:23 PM
15 0 0
Share this article:

लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रचला. आता हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या दैवताला जाणून घेण्यासाठी डॉ. सी. ग. देसाई यांनी सुखकर्ता-दुःखहर्तामधून गणेशोपासकांना उपास्य दैवताची सर्व माहिती पुरवली आहे. श्रीगणपती गजाननाचा वेदकाळापासूनचा उगम व विकास, गणपतीची स्तुती व उपासना सांगणारी उपनिषदे, श्री ब्रह्मणपतिसूक्तमची माहिती आणि सुक्त, श्रीगणपती मालामंत्र, त्याचे मराठी स्तोत्र, गणेश उपनिषदे व गणपती यांचा परिचय यातून देण्यात आला आहे. 

गणपती अथर्वशीर्ष, त्यातील विविध पाठभेद, शांतीपाठ, अथर्वशीर्षाचा गेयानुवाद, त्याचे विवेचन, गणेश यंत्रांची माहिती व गजाननाच्या कथाही सांगितल्या आहेत. श्री मुद्गलपुराणाचा परिचय, गणेश मुर्ती व चतुर्थीच्या निर्मितीचे रहस्य, गजमुखासंबंधी विविध उपपत्ती, उपासनेची साधने, कथा व महत्त्व, मराठी संत व कवींची गणेशस्तवनातील काही वेचे देत गणपती व गणेशपूजेविषयी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक, परदेशातील गणेशस्थाने, गणेशभक्त यावषयीही माहिती दिली आहे. 

पुस्तक : सुखकर्ता दुःखहर्ता
लेखक : डॉ. सीताराम गणेश देसाई
प्रकाशन : पंचतत्त्व प्रकाशन
पृष्ठे : ३०९
मूल्य : १६२ रुपये

(‘सुखकर्ता दुःखहर्ता’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search