Next
स्वातंत्र्यदिनी रत्नागिरीत अॅक्रेलिक आर्ट कार्यशाळा
BOI
Wednesday, August 14, 2019 | 09:02 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
१५ ऑगस्ट २०१९ रोजी रत्नागिरीत अॅक्रेलिक आर्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. स्वप्नजा मोहिते या कार्यशाळेत १० वर्षांवरील सर्वांना अॅक्रेलिक आर्टची माहिती प्रात्यक्षिकांसह दाखवणार आहेत.

पेंटिंग करावेसे खूप जणांना वाटते. बऱ्याच जणांना कधी कामाचा ताण कमी करण्यासाठी, तर कधी शाळेत असताना शिकणे राहून गेले म्हणून किंवा आपल्या घरात आपणच केलेले पेंटिंग भिंतीवर असावे म्हणून पेंटिंग करावेसे वाटते; पण त्यातील तंत्र माहीत नसते. ही अडचण लक्षात घेऊन डॉ. मोहिते यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात सहभागी होणाऱ्यांना पेंटिंग करण्यासाठी डॉ. स्वप्नजा मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. फ्लुइड माध्यमात चित्रे काढणाऱ्या डॉ. मोहिते यांच्या अॅक्रेलिक, रेझीन आणि अल्कोहोल इंक्स पेंटिंग्सची पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि गोवा येथे विविध प्रदर्शने झाली आहेत. पुण्याचे यशवंतराव चव्हाण कला दालन, मुंबईचे नेहरू सेंटर कला दालन, तसेच पणजीतील कला अकादमी येथे त्यांच्या रेझीन, अल्कोहोल इंक्स अशा माध्यमात काम करण्याची प्रात्यक्षिके झाली आहेत. जून २०१९पासून इटलीतील नेपल्स येथील कॅम मुझियममध्ये सुरू झालेल्या जागतिक स्तरावरील चित्रप्रदर्शनामध्ये डॉ. मोहिते यांच्या पेंटिंगची निवड झाली आहे. 

डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्या झिया मुकादम (१० वर्षे) आणि साईदीप फडके (१५ वर्षे) या दोन विद्यार्थ्यांच्या पेंटिंग्सची ‘क्रिएटिव्ह किड्स २०१९’ या कलानिर्वाण इंटरनॅशनल ग्रुपच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या चित्रप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. लहान वयापासूनच मुलांमध्ये ही चित्रकलेची आवड रुजवून त्यांना अशा चित्र प्रदर्शनांसाठी उद्युक्त करण्याचा मानस असल्याचे डॉ. मोहिते सांगितले. 

कार्यशाळेविषयी :
दिवस : १५ ऑगस्ट २०१९
वेळ : दुपारी तीन ते सायंकाळी सहा
स्थळ : स्नेहांकित, ऑटो शाइन कार वॉश सेंटरच्या मागे, छत्रपती नगर, शिवाजी नगर, रत्नागिरी
नावनोंदणीसाठी संपर्क : डॉ. स्वप्नजा मोहिते – ९५४५० ३०६४२

हेही जरूर वाचा
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search