Next
गर्भ संस्कार ते नवजात बालकाची निगा, बाळाचा आहार
BOI
Tuesday, November 14, 2017 | 12:21 PM
15 0 0
Share this article:

बाळाच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करणारी ही दोन्ही पुस्तके. पहिल्या पुस्तकात डॉ. संध्या डोईफोडे यांनी बाळाच्या आगमनाच्या पूर्वतयारीपासून माहिती दिली आहे.

रक्तगट, गर्भाधान विधी, गर्भिणी परिचर्या, गरोदरपणातील विहार व व्यायाम, गर्भसंस्कार, बाळाच्या वाढीचे टप्पे, पारंपरिक संस्कार; तसेच अन्य माहिती सचित्र दिली आहे.

दुसऱ्या पुस्तकात डॉ. अभिजित म्हाळंक व प्रा. अरुणा म्हाळंक यांनी बाळाची तीन महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंतची वाढ होताना आहार कसा असावा याचे मार्गदर्शन केले आहे.
 
कोणत्या टप्प्यात कोणता आहार द्यावा हे सांगताना त्यांनी फॅरेक्स व पेज, सूप-सार-खिरी, नाश्ता, थालीपीठ, लाडू, करंजी, पुऱ्या, वड्या असे विभाग केले आहेत. एक वर्षावरील बालकाला पोळी, पराठे, भाज्या, आमटी, कोशिंबिरीचा आहार कसा द्यावा याचा सल्लाही दिला आहे.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : २२४
किंमत : २४० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search